________________
(४४४)
Dasakaseem
भावना होय. यालाच भेदज्ञान म्हणतात. संवर व निर्जरा भावना स्वतंत्र आहेत. संवर व निर्जरा भावना मोक्षमार्गदर्शक आहेत. त्याचे वर्णन यथास्थान येईलच.
या तात्पर्य हेच की, जैन दर्शनात नऊ तत्त्व किंवा नऊ पदार्थ याचे अनन्यअसाधारण महत्त्व आहे. त्याचा ह्या बारा भावनांमध्ये समावेश होतो.
नऊ तत्त्वात पुण्य व पाप या दोन तत्त्वांचा समावेश आरनव तत्त्वात होतो आचार्य उमास्वातींनी सात तत्वांचाच उल्लेख केला आहे.२७१ आनव भावनेतच पुण्यानव व पापानव यांचा समावेश केला आहे.
म जैनदर्शनात पुण्य हे सुखप्राप्त करून देणारे तत्त्व व पाप हे दुःख प्राप्त करून देणारे आहे. सुख देणारे असो किंवा दुःख देणारे शेवटी दोन्ही कर्मच आहेत. आरनव द्वारानेच ते आत्म्यात प्रवेश करतात. म्हणून दोन्ही तत्त्वांचा आसवात समावेश केला गेला आहे. प्रश्न असा येतो की सुख तर सर्वांना प्रिय आहे मग त्याला आस्रव तत्त्वात का समाविष्ट केले ? त्याचे समाधान असे आहे की, पुण्यामुळे स्वर्ग प्राप्त होतो तर पापामुळे नर्क, तिर्यंच गतीचे बंध होते आणि जेव्हा पुण्याचा खजिना रिकामा होतो, मग पुन्हा चतुर्गती संसारात भ्रमण सुरू होते. स्वर्गप्राप्ती म्हणजे काही शाश्वत स्थान नाही. जैन दर्शनात मुमुक्षूचे ध्येय शाश्वत धाम प्राप्त करणे आहे. त्याच्यासाठीच सर्व साधना, आराधना व उपासना करायची आहे. मोक्ष ध्येय प्राप्त करण्यात पुण्यसुद्धा बंधन कारक आहे. पुण्य आणि पाप दोन्ही आनव आहेत. इथे एक बाब चिंतनीय आहे -
_ पाप हे आरनब आहे व पुण्यसुद्धा आस्रव आहे तरी सुद्धा जोपर्यंत पापानवाचा पूर्णपणे त्याग केला जात नाही, तोपर्यंत पुण्याचा त्याग करून चालणार नाही. आज आपण पाहतो की- माणूस पाप तर सतत करीत असतो आणि पुण्य कार्याचे नाव घेताच म्हणतात, पुण्य हे एक प्रकारचे बंधनच आहे तर मग अधिकच नुकसान होईल. कारण शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी पाप तर चालणारच नाही. पुण्याचा मोक्षाबरोबर सरळ संबधन नाही. पण पुण्याच्या माध्यमानेच तिथपर्यंत पोहोचता येईल. पुण्यकर्मामुळेच मनुष्य जन्म, आर्यक्षेत्र, योग्य समज प्राप्त होऊ शकते. म्हणून पुण्यतत्त्वाला हेय आणि उपादेय दोन्ही रूपात स्वीकार केले गेले आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी जहाजाचा उपयोग करावा लागतो, आणि किनाऱ्यावर पोहोचताच जहाज सोडून देणे आवश्यक असते. दोन्ही गोष्टी केल्याशिवाय आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जाणे संभव नाही. त्याचप्रमाणे प्रथमावस्थेत पुण्यतत्त्व अत्यावश्यक आहे. नंतर
Shashaurasisatanisit:
Cinsaste