________________
यक्त, तीन गुप्तींनी गुप्त; कषाय रहित जितेन्द्रिय गर्व रहित व निःशल्य (शल्य रहित) असतो तो जीव निराम्रव होतो."२६९
गौतमस्वामी पुनः भगवनांना प्रश्न विचारतात - भगवन् । प्रत्याख्यान करण्याने जीवाला कोणता लाभ होतो ? भगवतांनी उत्तर दिले हे गौतम प्रत्याख्यान (सांसारिक विषय वासनांचा त्याग) करण्याने जीव आग्नव द्वार बंद करू शकतो. इच्छा निरोध करण्याने जीव सर्व परद्रव्याच्या तृष्णाने रहित होऊ शकतो. आणि परिणामस्वरूप शांत बनतो.२७०
तात्पर्य - अप्रत्याख्यान आग्नव आहे. ज्यामुळे कर्माचे आगमन होते. जो प्रत्याख्यान (नियमबद्ध) करतो त्याच्या आत्म्यात नवीन कर्म प्रवेश करू शकत नाहीत. नवीन कर्माचे आगमन होत नाही. नवीन कर्माच्या आगमनाचा निरोध करणे अथवा आस्रवाला अडविणे हे कर्मापासून मुक्त होण्याचे प्रथम चरण आहे. म्हणून आग्नव भावनेचे यथार्थ ज्ञान असणे आवश्यक आहे. आत्म्यात कर्म कसे प्रवेश करतात, कर्माचे बंध कसे होतात, आस्रवामुळे संसारात कसे परिभ्रमण करावे लागते. याचे ज्ञान असेल तरच आसवांपासून परावृत्त होऊन निरानव राहण्याचा प्रयत्न केला जाईल.
फक्त आसवांच्या कारणांचा. भेद-प्रभेदांचा विचार करीत राहणे म्हणजे आस्रव भावना नव्हे. यात आसवांच्या स्वरूपाबरोबर ज्या आत्म्याच्या पर्यायात मोह-क्रोध, रागद्वेष रूप आस्रव भाव उत्पन्न होतात तरीही आत्मा या मोह, राग द्वेष इ. भावनेहून भिन्न आहे, पवित्र आहे, ध्रुव आहे, अशाप्रकारे त्या आत्म्याचाही विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आस्रवभावनेचे चिंतन अशाप्रकारे पण करावे की, ज्यामुळे आम्रवभावांपासून विरक्ती व आत्मस्वभावात अनुरक्ती उत्पन्न व्हावी. आग्नव भावनांच्या चिंतनाचा उद्देश्य आहे, आसवांचा निरोध करणे. आस्रव भावाचा अभाव करणे आणि त्याला जडमूळापासून नष्ट करणे.
आरंभी मिथ्यात्वादी आस्रव-भेदांचे वर्णन केले आहे. त्यापासून माझा आत्मा सर्वथा भिन्न आहे. असे चिंतन करणे म्हणजे आनवभावना होय.
बारा भावनेत नऊ तत्त्व - बारा भावनापैकी प्रथम सहा अनित्यादि भावना वैराग्यमय आहेत. नंतरच्या सहा भावना तात्त्विक आहेत. आग्नव भावनेत आस्रव तत्त्व बघ तत्त्व, पुण्यतत्त्व व पापतत्त्वाची चर्चा सहज होऊन जाते. पहिल्या सहा भावनांत जावाची अनित्यता आणि जीव अजीवाच्या भिन्नतेबद्दलचे वर्णन केले गेले आहे. जीव
ण अजीवाला जाणणे म्हणजेच शरीर व आत्मा भिन्न आहे हे जाणणे. हीच अन्यत्व