________________
(४४१)
आणि मान (अहं) केल्यामुळे लागते.
२३) प्रयोग क्रिया अथवा प्रायोगिक क्रिया मन, वचन, काया यांच्या दुष्प्रयोगाने अशुभ प्रयोग करण्याने लागणारी क्रिया.
२४) सामुदानिकी क्रिया पुष्कळसे लोक एकत्रित होऊन एकाच प्रकारची क्रिया करण्याने चांगले-वाईट दृश्य एकत्रितपणे पाहण्याने. आरंभ समारंभाचे कार्य एकत्र मिळून केल्याने सामुदानिकी क्रिया लागते.
-
२५) ईर्यावहिया क्रिया (ईर्यापथिकी क्रिया) जाण्यायेण्याची ( गमनागमन) क्रिया म्हणजे ईर्यावहिया होय. ह्या क्रियेला ईर्यापथ क्रिया पण म्हणतात. ही छद्मस्थ अकपायी साधूना तथा सयोगी केवली अरिहंताना लागणारी क्रिया. इर्यापथिकी क्रिया वीतरागी अकराव्या, बाराव्या, तेराव्या गुणस्थानवाल्या माणसालाच असते.
वरील पंचवीस क्रिया या कर्मबंधाच्या कारण आहेत. म्हणून सम्यकदृष्टी जीवांनी यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. २६७
जिथे जिथे आस्रव आहे तिथे तिथे बंध आहे. आणि त्यामुळेच संसाराचा प्रवाहसुद्धा गतिशील राहतो. कारण जोपर्यंत आस्रव कर्म आगमनाचे दार बंद होत नाही तोपर्यंत कर्माचे बंधन होतच राहते. आणि कर्माचे बंधन चालू राहणे म्हणजेच संसार होय.
आस्रव भावनेत साधकाने असे चिंतन करावे की संसारात उत्थान व पतन जे काही होत आहे ते व्यक्तीने स्वतःच बांधलेल्या कर्मानुसार होते. राग-द्वेषाच्या परिणतीमुळे आत्मा आनवद्वारा संग्रहित कर्माना बांधतो. संसारात मुख्यतः दोन तत्त्वे आहेत - चेतन आणि जड (अजीव). या जगात जितके प्राणी आहेत ते एकांतरूपाने चेतन नाही आणि एकांततः जड (अजीव) नाहीत. परंतु जीव व पुद्गलाच्या संयोगाने बनलेले आहेत. जर या जड शरीरात चेतन तत्त्वाचे अस्तित्व नसते तर कोणतीच क्रिया कधीच झाली नसती. आपण पाहतो की या शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर जे कलेवर राहते ते कोणतीच क्रिया करू शकत नाही. स्पंदनरहित ते मात्र शव असते. जीवाचा जडाशी संबंध नसेल तर सृष्टीचे अस्तित्व राहणार नाही. जेव्हा आत्मा साधना करून कर्म बंधानापासून पूर्णतः मुक्त होतो मग तो या संसारात पुन्हा येत नाही. कारण संसार तोपर्यंतच आहे जोपर्यंत जीवाचा जडाशी संयोग आहे.
यावरून स्पष्ट होते की, वस्तू व पदार्थ व्यक्तीला बद्ध करीत नाही. राग-द्वेष