________________
Rai
|
१२) स्पष्टी क्रिया - राग द्वेषाने कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यामुळे लागणारी क्रिया.
१३) पाडुचिया (प्रतीत्यिकी) क्रिया - जीव व अजीव या बाह्य वस्तूच्या निमित्ताने जे राग द्वेष निर्माण होतात. त्यामुळे लागणारी क्रिया.
१४) सामन्तोपनिपातिकी क्रिया - जीव व अजीव वस्तूचे जे संग्रह केले आहे. त्या संग्रहाला पाहून लोकांनी प्रशंसा करावी. प्रशंसा ऐकून आनंदित व्हावे असे केल्याने ही क्रिया लागते.
सामन्तोपनिपातिकी क्रियेचे बरेच अर्थ केले गेले आहेत. रस्त्यावर कुठेही मलमूत्र विसर्जन करणे. धुंकणे अशाप्रकारे येणाऱ्या जाण्याच्या रस्त्यावर घाण करणे किंवा तेलातुपाची भांडी उघडी ठेवणे. झाकण न ठेवण्याने त्यात जीवजंतू पडतात त्याचा दोष लागतो.
१५) स्वहस्तिकी क्रिया - एक-दुसऱ्यात भांडण लावून देण्यामुळे लागणारी क्रिया. आपण स्वत: कोणत्याही जीवाला मारणे किंवा कुणाकडून मार देणे.
१६) नैसृष्टिकी क्रिया - कोणत्याही वस्तूला अव्यवस्थितपणे ठेवणे किंवा फेकणे यामुळे लागणारी क्रिया. उदा. ढेकूण, उवा यांना मारणे किंवा उंचावरून फेकणे. बाण, लाकूड, लाकडी इ. वस्तूंना फेकण्यामुळे लागणारी क्रिया.
१७) आज्ञापनिका - इतर कुणाला आज्ञा देऊन क्रिया करवून घेणे. किंवा तीर्थंकराच्या आज्ञेविरुद्ध उपदेश, कथन करण्याने ही क्रिया लागते.
१८) वैदारणिका क्रिया - जीव किंवा अजीव वस्तूंची तोड-फोड चिरफाड करण्याने लागणारी क्रिया.
१९) अनाभोग प्रत्यया क्रिया - असावधनतेने, उपयोग शून्यतामुळे होणारी क्रिया. वस्त्र-पात्र इ. घेणे, ठेवणे किंवा प्रतिलेखन असावधानतेने केल्यामुळे लागणारी क्रिया.
२०) अनवकांक्षप्रत्यया क्रिया - हिताहिताची उपेक्षा केल्यामुळे लागणारी क्रिया अथवा धूर्तताच्या आश्रयाने इहलोक परलोकाची पर्वा न केल्यामुळे दोन्ही लोक बिगडणे. धर्माच्या विरुद्ध काम करण्याने ही क्रिया लागते.
२१) प्रेमप्रत्यया क्रिया - प्रेमभावनेमुळे लागणारी क्रिया. ही क्रिया मायाचार आणि लोभ केल्यामुळे लागते.
२२) द्वेष प्रत्यया क्रिया - द्वेषभावनेमुळे लागणारी क्रिया. ही क्रिया क्रोध केल्याने
RombihaDDNeGyellosinilaygyan