________________
बंधाचे कारण आहेत. जोपर्यंत वर उल्लेखलेले आनबाचे भेद-प्रभेद जाणून घेऊन त्यापासून मुक्त होण्यासाठी त्यांचा त्याग केला नाही तर मुक्त होणे शक्य नाही.
आस्रव त्याग करण्यायोग्य आहेत हे, जाणल्याशिवाय त्याचा त्याग होऊ शकणार नाही. त्यासाठी आसवांचे यथार्थ स्वरूप यथार्थपणे समजून घेऊन त्याचे परिणाम समजून घेऊन सोडण्यायोग्य आनवांचा साप जशी आपली कात सहजपणे टाकतो त्याप्रमाणे सोडायला पाहिजे. आणि सतत चिंतन करायला पाहिजे की या कर्मांच्या आगमनाला थांबवून कर्मरूपी कर्जापासून कसा बचाव करू ? ज्याक्षणी त्या कर्जापासून मुक्त होऊ तो क्षण खरोखर धन्य होईल.
___ दशवैकालिक सूत्रात अयतनापूर्वक गमन करणे, उभे राहणे, बसणे, झोपणे, भोजन करणे व बोलणे हे पापकर्माचे बंधन करणारे आहेत, असे सांगितले आहे. कटू फल देणारे आहेत. त्याचप्रमाणे पुढे असेही वर्णन आहे की, यतनापूर्वक खाणे, बोलणे, चालणे इ. क्रिया केल्यास कर्मबंध होत नाहीत.
( यात यतना व अयतना हे शब्द शास्त्रीय पारिभाषिक आहेत. अयतनाचा अर्थ आहे उपयोगशून्यता, असावधानी, अविवेक, अजागृती, प्रमाद.
जो सर्व जीवांना आपल्या आत्म्याप्रमाणे मानतो, जो सर्व जीवांना सम्यक दृष्टीने पाहतो व ज्याने आत्रवाचा निरोध केला आहे. जो दांत आहे - त्याचे पापकर्म बांधले जात नाहीत.२६८
६३ व्या गाथामध्ये शयंभव स्वामींनी स्पष्ट केले आहे की, आग्नवद्वार बंद केले तर पापकर्माचे बंध होत नाहीत.
अशाप्रकारे आगमग्रंथामध्ये तथा आगमोत्तर ग्रंथात आनवांचे भेद, त्यामुळे लागणारे दोष हानी-लाभ इ. जाणले. जाणण्याचे फल त्याग आहे. "णाभरवतव फलं विरइ" आणि तो त्याग पण दृढ असला पाहिजे ज्याच्याने आत्म विकास करण्याची परिपूर्णता येते व ती साधना उपलब्ध करून जन्ममरण रूप संसारापासून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त होऊ शकते. जीवाचे परमलक्ष्य आहे निर्वाण प्राप्त करणे. निर्वाण प्राप्तीसाठी निराग्नव होणे आवश्यक आहे. निरानव होण्याची पद्धती-गणधर गौतमस्वामींनी श्रमण भगवान महावीर स्वामींना विचारले - "भगवन् ! जीव निराग्नव कसा होऊ शकतो ?" भगवान महावीर स्वामींनी उत्तर दिले - हे गौतम ! प्राणातिपात, मृषावाद, अदत्तादान, मैथुन, परिग्रह, रात्रिभोजन यांचा त्याग करणे इ. मळे जीव निरानव होतो. जो पाच समितीनी
.....5
. THIS
VIDHASHR