________________
(४३६)
करून अभिमान करणे कदापि योग्य नाही.
आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. आळस नरकाचे द्वार आहे.
पंचवीस कषाय - चोरी करणारे चोर रात्रीच्या वेळी जेव्हा सगळीकडे सामसूम झालेली असते, तेव्हा चोरी करतात आणि श्रीमंतांच्या घरी डाका घालतात. जिथेही कमीत कमी माणसे असतील. परंतु कषायरूपी चोर तर रात्र असो की दिवस, जंगलात असो की शहरात निर्भयपूर्वक तीव्र रस असणारे अशुभकर्मरूपी शस्त्र फेकून आत्म्याची संपत्ती ज्ञान, दर्शन, चारित्ररूपी संपत्ती लुटतात. म्हणून कपायरूपी चोरापासून सावध राहिले पाहिजे. कषायाच्या प्रकारांचे वर्णन चौथ्या प्रकरणात अशुभभावनेत झाले आहे. म्हणून इथे बिस्तार न करता मात्र कषायाचा उल्लेख केला आहे.
पंचवीस कषायांच्या संयोगाने कर्मात अनुभाग शक्ती आणि स्थिती शक्ती निर्माण होत असते. म्हणून कषायरूपी आनवद्वार बंद ठेवण्यासाठी क्षमा, मृदुता, सरलता आणि संतोष यांचा किल्ला मजबूत बांधला पाहिजे. ज्या योगे कषायांना पराजित करू शकू. पंधरा योग
मन, वचन कायाच्या प्रवृत्तींना योग म्हणतात. नदीच्या उगमाशी मुसळधार पाऊस पडत असेल अशावेळी नदीच्या प्रवाहाला थांबवणे शक्य नाही. त्याचप्रमाणे आपली व्यावहारिक प्रवृत्ती जेव्हा चालते त्यावेळी चित्तवृत्तींना थांबवणे फार कठीण होते. त्याचप्रमाणे जोपर्यंत मन, वचन, काया यांच्या दुष्ट योगांच्या प्रवृत्ती चालतात तोपर्यंत कर्माची निवृत्ती होऊ शकत नाही.
आत्म्याशी कर्माचा संयोग होणे म्हणजे आत्मा कर्माशी ज्यामुळे जोडतो त्याला योग म्हणतात. ती प्रवृत्ती मन, बचन, काया यांच्याद्वारे घडते. या तिघांचा प्रवाह प्रचंड प्रमाणात चालत असतो, तेव्हा ते दंड रूपात मानले जातात. दंड तीन प्रकारचे आहेत. मनदंड, वचनदंड, कायादंड, गुन्हेगार गुन्हयामुळे दंडित होतो. तसेच आत्मासुद्धा मन, वचन, काया यांच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे दंडित होतो. म्हणून दुष्ट योगांना दंडरूप म्हटलेले आहे. जेव्हा मन, वचन कायेचा प्रवाह ज्येष्ठ महिन्यात संथ वाहणाऱ्या नदीप्रमाणे मंद हाता, तेव्हा योगाच्या स्थानी गुप्तीची निष्पत्ती होते. गुप्ती तीन प्रकारच्या आहेतमनगुप्ती, वचनगुप्ती, कायगुप्ती.
सामान्य जीव योगाला सर्वथा अवरुद्ध करू शकत नाही. कारण केवलज्ञानाच्या