________________
(४३४)
ताकता पराये छिद्र नीति है हरामकी ||
पर की निंदा सुन कान खुशी नहीं होना कभी ।
पीछे से करेगा जर, बढ़ी तेरे नाम की ।
तिलोक कहत निंदक । तेरे माहे दोष है,
यहाँ से पर जाय आगे, गति यम धाम की | २५७
दुसऱ्यांचे दोष पाहून त्यांना अपराधी घोषित करतात. अशाप्रकारच्या व्यवहाराने स्वतःचे मन मलिन करतात व अशा भावनेमुळे असे संस्कार निंदकाच्या मनावर होतात की काही काळातच तो स्वतः त्या दोषांनी ग्रासला जातो. परिणामस्वरूप या पापपंकात रुतता जातो. दुसऱ्यांना सुधारण्याच्या भ्रमात स्वतःच निंदनीय आणि धिक्काराला पात्र बनतो.
निंदा करण्याचा स्वभाव असलेली व्यक्ती हळूहळू फार वाईट बनत जातो. एक लौकिक दृष्टांत आहे एका राजाने एक रत्नजडित सुन्दर मनोहर महल बांधला, तो महाल पाहण्यासाठी अनेक लोक आले. सर्वांनी त्याची खूप प्रशंसा केली. परंतु एक चांडालाने त्या महालाच्या चारी बाजूने पाहिल्यानंतर म्हणाला, की या महालात संडास तर बांधलेच नाही. अशाच प्रकारची निंदकाची नेहमी नीच बुद्धी असते. दोषदृष्टी असणाऱ्याला चांगले कधी दिसतच नाही. सदगुण पाहण्याऐवजी फक्त दुर्गुणच पाहतो. निंदा करणाऱ्याने विचार करायला पाहिजे की माझ्यात कोणताच दोष नाही का 2 एक ही अवगुण नाही का ? मी सर्वगुणसंपन्न आहे काय ? महत्त्वाची गोष्ट अशी की निंदकाच्या मनात निंदा करणे हा दुर्गुण घर करून बसलेला असतो, यावरून सहज स्पष्ट होते की निंदक स्वतः निंदेचे पात्र आहे.
४) निद्रा - निंदेप्रमाणे निद्रासुद्धा सत्कार्यात विघ्न निर्माण करणारा महान शत्रू आहे. धर्मकार्यातसुद्धा या निद्रारूपी प्रमादामुळे इहलोक व परलोक दोन्ही भव दुःखमय
बनतात.
५) विकथा निरर्थक आणि पापकारी गोष्टीत व्यर्थ वेळ घालविणे म्हणजे विकथा होय. विकथा चार प्रकारच्या आहेत - देशकथा (२) राजकथा ( ३ ) स्त्रीकथा (४) भोजनकथा अशा कथा वार्ता मध्ये मनुष्य आपला अमूल्य वेळ, आपले किंमती जीवन पूर्ण करतो. हा आपल्या जीवनावर अन्यायच नाही का ?
-