________________
(४२५)
SIKONMineJAVLY
hiristiatuRAISBE
तर गह आहे पण भुसा देखील पशूच्या खाद्यासाठी उपयुक्त आहे, म्हणून उपादेय आहे. आत्म्याच्या स्वन्मुखी अध्यवसायाने जी आंतरीक निर्मलता, उज्ज्वलता उत्पन्न होते ती कर्म निर्जरची हेतू रूप बनते. ते तपश्चरणाचे रूप आहे पण तेथे जी अनुगत बंधाची प्रक्रिया होते ती शुभात्मकता घेऊन चालते.
दिगम्बर परम्परेत अशुभ, शुभ आणि शुद्ध - ह्या तीन प्रक्रियांचा उल्लेख झाला आहे. अशुभ पापानव मूलक, शुभ पुण्याग्नव मूलक आहे, पण शुद्ध अनाग्नव अवस्था आहे ती बंध रूप नाही. कारण तेथे आत्म्याचा स्वरूपोन्मुख उद्यम अथवा पुरुषार्थ आहे. जसे एखादी व्यक्ती बाहेरून येऊन घरात प्रवेश करते तर ती घरात पोहोचतो. गल्ली रस्ता आपोआप सुटतात पण घरापर्यंत पोहोचण्यात तर त्यांचे सहाय्य आहेच. धर्माचा संबंधपण पुण्याग्नवा बरोबर तसाच आहे, जो मोक्षापर्यंत पोहचवण्यासाठी नौकेप्रमाणे आहे. ह्या तात्त्विक महानतेचा सतत भावना प्रणव होऊन अनुभव केला जाऊ शकतो.
श्री सोमदेवसूरींनी अशुभ योगाने कर्मबंध करणाऱ्या स्थितीचे वर्णन करताना लिहिले आहे की हा जीव आंतरीक कषायाने कलुषित होऊन अशभ योगाने कर्मबंध करतो. त्याची दशा त्या हत्तीसारखी आहे. जो हत्तीणीमध्ये लंपट अथवा आसक्त होऊन दोरीच्या बंधनात बांधला जातो. म्हणून ह्या खराब कार्याला सोडा. ग्रंथकाराने काव्यात्मक शैलीत आस्रवाचा फार सुंदर परिचर करून दिला आहे. संकल्परूपी कल्पवृक्षाचा आश्रय घेऊन साधकाचे चित्त मनोरथाच्या सागरात बुडत आहे. वास्तविक ते काहीच तथ्यात्मक नाही. त्याच्यामुळे तर पापाचा संचयच होतो.
___ ज्याचे मन निर्धनतेने धायळ आहे, त्यांचे चित्त जसे खाण्याच्या मात्र कल्पनेने उल्लसित होऊ लागते तसेच तुम्ही मोठ्या मोठ्या मनोरथाच्या उत्कट मनोकामना करून हर्षित होत आहात.
जर तुम्ही परमात्म स्वरूपाचे चिंतन करून हर्षित झाले असता तर जन्म व्यर्थ का गेला असता ?२५० इथे साधकाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सांगितले आहे की तुम्ही कर्मप्रवाहात वहात जात आहात. तो प्रवाह अथवा आरनब तेव्हाच थांबेल जेव्हा स्वतःला परमात्म भावनेबरोबर जोडाल.
आपल्या आत्म्याजवळ नैसर्गिक आध्यात्मलक्ष्मी, आहे, पण ती कर्माच्या सघन सधनतर आवरणात हरवली आहे. आनव जीवाला किती अपकारक आहे हे समजणे आणि अनुभवित करणे एक साधकासाठी परम आवश्यक आहे.