________________
anowsksimirsiandiarionindiidos
m
nosie
i
Mathuraishind
उसाचा प्रवेश होतो तेव्हा संसाररूपी समुद्रात पतन होते आणि केवलज्ञान, अव्यावाध सुख इत्यादी अनन्तगुण रत्नाने पूर्ण जो मुक्ती स्वरूप वेला पत्तन (मुवती नगर) आहे त्याला हा जीव प्राप्त करू शकत नाही.२४७
अन्यत्र आग्नवाचे मिथ्यात्व इत्यादी कारण सांगितले आहे, पण योगशाखामध्ये मन, बचन आणि शरीरद्वारा गृहीत पुदगलाच्या निमित्ताने आत्मा चांगले वाईट मनन, भाषण आणि वीर्य परिणमन करतो. ह्या तीन योगाला शुभाशुभ कर्माचे जनक सांगितले आहे.२४८
योग प्रवृत्तीचा सूचक आहे, त्याच्याने शुभाशुभ कर्माचा बंध कसा होतो हे दाखवताना आचार्य लिहितात की -
मैत्री, प्रमोद इत्यादी शुभभावनेने भावित मनोयोग शुभकर्माचा अर्थात सातवेदनीय सम्यक्त्य, शुभ आयुष्य, नाम, गोत्राचा जनक असतो आणि तेच मन जेव्हा क्रोध इत्यादी कषाय आणि इंद्रिय विषयात आक्रांत असते तेव्हा अशुभ कर्माचा जनक होते.
शुभकर्माच्या उपार्जनासाठी मिथ्या विवर्जित श्रुतज्ञानाश्रित वचन असतात आणि त्याच्या उलट मिथ्या व शाखविपरीत वचन अशुभकर्माचे कारणरूप होतात. हीच गोष्ट शरीराबरोबर जोडलेली आहे. जेव्हा शरीर सुगुप्त म्हणजे सम्यक प्रकारे गोपन केलेला अर्थात कुचेष्टेने रहित असतो तेव्हा तो शुभकर्माचे उपार्जन करतो. व सतत आरंभ समारंभ युक्त प्राणी घातक हिंसा इत्यादी प्रवृत्ती करण्यात प्रवृत्त होतो तेव्हा तो अशुभकर्माचा बंध करतो.
इथे एक गोष्ट विशेषतः विवेचनीय आहे - योगचे शुभ-अशुभ दोन्ही भेद जे क्रमशः भौतिक सुख आणि दुःखप्रद आहे, तत्त्वतः अनुपादेय आहेत. कारण दोन्हीमध्ये बंधात्मकता आहे. ज्याप्रमाणे लोहबंधाने बद्ध व्यक्ती दुःखी होते त्याचप्रमाणे सोन्याच्या बंधनाने बद्ध व्यक्ती पण दुःखी होतेच. पाहाण्यासाठी सुवर्ण जरी सुंदर असले तरी दुःखोत्पत्तित तर लोखंडाप्रमाणेच असतो. म्हणून शुभपण शेवटी बंधनच आहे.
परंतु इतके आवश्य आहे की साधना काळात पुढे बाढण्यात शुभ पुण्यात्मक वृत्तीला बाधक मानले जात नाही, यद्यपि त्या प्रवृत्तीला अप्रवृत्तीत परिणत करावे लागते, पण साधकाच्या साधनेत तसा तात्कालिक बदल होत नाही. हे श्रम साध्य आहे पण एक मुमुक्षू त्या स्थितीपर्यंत भावनेच्या बळाने पोहचू शकतो.
शुभारम्नव जनित पुण्याच्या संबंधी आणखी विशेष जाणण्यासारखे आहे. गव्हाची शेती करतात तेव्हा गव्हाच्या दाव्याबरोबर भुसा अथवा घासपण उत्पन्न होतो. मुख्य प्राप्तव्य
S