________________
(४२२)
KANDHAanishulion
आहे. इंद्रियाने होणाऱ्या पापामुळे चतुर्गतितभ्रमणाचे दुःख प्राप्त होते. २४३
आहार, भय, मैथुन आणि परिग्रह मूलक संज्ञा, तीन गौरव (त्ररद्धी, रस, साता) क्रोध, मान, माया आणि लोभरूपी कषाय इत्यादी आनव द्वाराने पापाचा आगमन होतो तो विनाशकारक आहे.
ज्याप्रमाणे नावेत जर छिद्र झाले तर ती पाण्याने भरून समुद्रात बुडून जाते, त्याचप्रमाणे आस्रव भव सागरात बुडवणारा आहे. आग्नवाच्या स्वरूपाचे, दुःखमय परिणाम इत्यादीचे पुन्हा पुन्हा चिंतन करता करता त्याच्या परित्यागाची प्रेरणा जागृत होते...
भगवती आराधनामध्ये आचार्य शिवार्यांनी आस्रव भावनेचे वर्णन करताना कुन्दकुन्दाचार्याप्रमाणेच मिथ्यात्व, असंयम, कषाय आणि योगाला आरनव म्हटले आहे.
तेलाने माखलेल्या शरीराला लागलेली धुळ मळररूप होते त्याचप्रमाणे जीवाच्या मिथ्यात्व इत्यादी परिणामाने लोक मध्ये सर्वत्र प्रसरलेले कर्म पुदगल आकृष्ट होऊन आत्म्यावर लिप्त होतात. व पुढे आचार्य शिवार्यांनी इंद्रिय भोगाची तुच्छता आणि मनुष्य भवाची श्रेष्ठता दाखवताना लिहिले आहे की जसे कुणी मनुष्य राख इत्यादीसाठी बहुमूल्य चंदनाचे लाकूड जाळून टाकतो तसेच मनुष्य अती तुच्छ विषयाच्या लोभात भव नष्ट करतो. वास्तविक ह्या मनुष्य देहाद्वारा तर अतिन्द्रिय अनन्तसुख पण प्राप्त होऊ शकते. ह्याच्यात आनवाला पू (पस, पीब)ची उपमा दिली आहे. असे अपथ्य सेवन केल्याने जखमेमध्ये पू येतो तसेच मन, वचन, कायेच्या प्रवृत्तीने कर्माचा आस्रव होतो.
अनुकम्पा आणि शुद्ध प्रयोगाने विपरीत परिणाम अशुभ कर्माच्या आस्रवाचे द्वार आहे.२४४
स्वामी समन्तभद्र यांनी परोपकार, दया इत्यादीला पुण्यानव आणि परिग्रह, अन्याय प्रवृत्ती, सप्त व्यसन, इत्यादीला पापानव म्हटले आहे. २८१
कार्तिकेयानुप्रेक्षेमध्ये ८८ ते ९४ गाथापर्यंत आनबानुप्रेक्षेचे विवेचन केले गेले आहे. जीवाच्या प्रदेशाच्या हलन-चलनाला योग म्हणतात, हे योग मोहनीय कर्माच्या उदयाने युक्तपण असतात आणि अयुक्तपण असतात. अर्थात मोहनीय कर्माच्या उदयावस्थेतपण त्यांची प्रवृत्ती होते व त्याच्याशिवायही त्यांची प्रवृत्ती होते. योग तेराव्या गुणस्थानापर्यंत राहातात आणि मोहनीय कर्माचा उदय दहाव्या गुणस्थानापर्यंत होतो. म्हणजे