________________
(४२०)
तत्त्वार्थवार्तिकमध्ये अकलंकदेव लिहितात की आसवाच्या दोषांचा विचार करणे सागवानपेक्षा आहे. आस्रव इहलोकात आणि परलोकात अपाययक्त आहे. इन्द्रिय इत्यादीचा उन्माद महानदीच्या प्रवाहाप्रमाणे तीक्ष्ण आहे.२४०
ज्याप्रमाणे महानदीच्या प्रवाहाचा वेग अती तीक्ष्ण असतो आणि अकुशलच्या आगमनाचा आणि कुशलच्या निर्गमनाचा हेतुरूप असतो त्याचप्रमाणे ह्या इंद्रियइत्यादी आग्नव पण जीवाला अकल्याणाने युक्त करण्यासाठी आणि कल्याणाने वंचित ठेवण्यासाठी मार्गरूप आहे.
इंद्रिये पाच आहेत. त्यातल्या प्रत्येकचा विचार करण्यायोग्य आहे, त्याचे स्वरूप तत्त्वार्थ वार्तिक आणि तत्त्वार्थ भाष्यात जवळ जवळ सारखेच दिले आहे. दोघांच्या सांगण्याचा तात्पर्य सारखाच आहे.
स्पर्शेन्द्रिय - वनविहारी मदान्ध हत्ती कृत्रिम हत्तीणीला पाहून स्पर्शन्द्रियाच्या ज्वाराने मत्त होऊन खड्डयात पडून मनुष्याच्या आधीन होतो आणि वध, बंधन, वाहन, अंकुश, ताडन, महावत आघात इत्यादीच्या तीव्र दुःखांना भोगतो. आणि पूर्वी आपल्या समूहाबरोबर स्वच्छदतेने फिरण्याच्या सुखाचे स्मरण करून क्षणोक्षणी भयंकर दुःखी होतो.
रसेन्द्रिय - जिव्हेच्या वशीभूत झालेले प्राणी दोन्ही भवांमध्ये क्लेशालाच प्राप्त होतो, ज्याप्रमाणे मेलेल्या हत्तीच्या शरीरावर बसलेला, पण नदीच्या वेगात पडलेला कावळा अती क्लेश अथवा मरणाला प्राप्त होतो, मांसखण्डाच्या भक्षणाची अतिशय लुब्धता ठेवणाऱ्या मच्छची जी दशा होते, तीच दशा रसेन्द्रियच्या वशीभूत झालेल्या सर्व प्राण्यांची
SAREE
होते.
घ्राणेन्द्रिय - सर्पाला पकडणारे अशी औषधी सर्पाच्या निवास स्थानाजवळ ठेवतात की त्याचा वास त्यांना अतिशय प्रिय वाटतो, त्याच्या लोभाने सर्प तिथे येतात आणि पकडले जातात. तशीच अवस्था नासिका इन्द्रियाच्या वशीभूत झालेल्या प्राण्याची होते.
चक्षुरिन्द्रिय - दिव्याच्या प्रकाशाला पाहून चंचळ होणाऱ्या फुलपाखराची जशी पतित दशा होते, चक्षुरिन्द्रियाच्या विषयात आसक्त प्राण्याचीपण तीच दशा होते.
श्रोतेन्द्रिय - श्रोतेन्द्रियच्या वशीभूत झालेल्या प्राण्याची स्थिती गायनाचा ध्वनी ऐकून शिकाऱ्याच्या जाळ्यात फसणाऱ्या हरणासारखी होते.