Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
२३२ कपाले यद्वद्दापः स्युः श्वदृतौ च यथा पयः । आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम् || १२|३६|४२
३९
ज्याप्रमाणें मस्तकाच्या कवटींत ठेवलेले पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पिशवीत घातलेलें दूध आश्रयस्थान वाईट असल्यामुळे दूषित होतें, त्याप्रमाणें आचारहीन मनुष्याचें ज्ञान व्यर्थ होतें.
२३३ करिष्यन्न प्रभाषेत कृतान्येव तु दर्शयेत् || ५|३८|१६ एकादी गोष्ट करण्याचें मनांत असतांच उगाच बोलू नये. काय तें करूनच दाखवावें.
२३४ कर्णिनालीकनाराचान् निर्हरन्ति शरीरतः ।
वाक्शल्यस्तु न निर्हर्तुं शक्यो हृदिशयो हि सः || ५ | ३४।७९
शरीरांत रुतलेला बाण, तीर किंवा भाला उपटून काढतां येतो. वाग्बाण मात्र उपटून काढतां येत नाहीं; कारण तो हृदयांत खोल शिरून बसलेला असतो. २३५ कर्तव्यमिति यत्कार्य नाभिमानात्समाचरेत् ||३|२|७६ कर्तव्य म्हणून जें करावयाचें तें अहंकारबुद्धीनें करूं नये.
२३६ कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च ।
उद्धरेद्दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत् ||१|१४० /७२
सौम्य किंवा तीव्र कोणत्याहि उपायाने प्रथमतः आपला हीन स्थितींतून उद्धार करावा; आणि समर्थ होऊन धर्माचरण करावें.
२३७ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || ६ |२६|४७
[ अर्जुना ], फक्त कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, कर्मफलाच्या ठिकाण मुळींच नाहीं. [ यासाठी ] तूं कर्मफलाची इच्छा करूं नकोस. तसेंच कर्म न करण्याचाहि आग्रह धरूं नको.
२३८ कर्मभूमिरियं ब्रह्मन् फलभूमिरसौ मता ||३|२६१।३५ मृत्युलोक ही कर्मभूमि असून परलोक ही फलभूमि आहे, असें म्हणतात.
For Private And Personal Use Only