Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१००९ सुप्रज्ञमपि चेच्छ्ररमृद्धिर्मोहयते नरम् || ३ | १८१।३०
तीव्र बुद्धीच्या शूर पुरुषाला देखील ऐश्वर्याचा मोह पडत असतो.
१०१० सुप्रणीतो बलाघो हि कुरुते कार्यमुत्तमम् ।
अन्धं बलं जडं प्राहुः प्रणेतव्यं विचक्षणैः ॥२/२०१६
शक्तीचा ओघ कुशलतेने वळविला म्हणजे त्याच्याकडून उत्तम प्रकारचें कार्य होतें. बळ हे अंधळें असून जड ( म्हणजे अचेतन ) आहे. त्याचा शहाण्या में [ इष्टकार्याकडे ] उपयोग करून घेतला पाहिजे.
१०११ सुप्राकृतोऽपि पुरुषः सर्वः स्त्रीजनसंसदि ।
स्तौति गर्वायते चापि स्वमात्मानं न संशयः ।। १२।२८४।२७
कोणीहि अगदी सामान्य प्रतीचा सुद्धां पुरुष स्त्रीजनांच्या समुदायांत आपली आपणच स्तुति करून प्रौढी मिरवतो यांत संशय नाहीं.
१०१२ सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबन्धः श्लथायते ।। १।२२१।१७
[ अर्जुन सुभद्राविवाहानंतर आपल्या नव्या सवतीला उद्देशून द्रौपदी अर्जुनाला म्हणते. ] ओझें एकदां घट्ट बांधले असलें, तथापि त्यास जर पुनः दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच !
१०१३ सुमन्त्रिते सुविक्रान्ते सुकृते सुविचारिते ।
सिध्यन्त्यर्था महाबाहो दैवं चात्र प्रदक्षिणम् || ३ | ३६।७
[ युधिष्ठिर भीमसेनाला म्हणतो ] हे महाबाहो, चांगल्या तऱ्हेची सल्लामसलत, चांगल्या तऱ्हेचा पराक्रम, चांगल्या तऱ्हेचा विचार आणि चांगल्या तऱ्हेचें कर्तृत्व यांच्या योगानें मनोरथ सिद्धीस जातात; परंतु या ठिकाणीं दैवाचीहि अनुकूलता असावी लागते.
म. भा. ११
For Private And Personal Use Only