Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२३६ न शोकपरितापेन श्रेयसा युज्यते मृतः ॥ ४।२५।२ शोकसंतापामुळे मृताला कधींही सद्गति प्राप्त होत नाहीं. २३७ न शोभार्थाविमौ बाहू न धनुर्भूषणाय मे ।
नासिरबन्धनार्थाय न शराः स्तम्भहेतवः || २।२३।३१ अमित्रमथनार्थाय सर्वमेतच्चतुष्टयम् || २।२३।३२
( लक्ष्मण रामाला म्हणतो ) हे माझे बाहु कांहीं शोभेकरितां नाहींत, हें धनुष्य भूषण म्हणून मीं बाळगिलेलें नाहीं. ही तरवार मी कांहीं कंबरेला बांधून ठेवण्याकरितांच घेतलेली नाहीं व हे बाण स्वस्थ पडून राहण्याकरितां मी धारण केलेले नाहींत. या सर्व चारीही वस्तु शत्रूंचा नाश करण्याकरितांच आहेत. २३८ नष्टं दृष्ट्वा नाभ्यनन्दन् विपुलं वा धनागमम् ।
पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाप्यनन्दत || २|४८५
( वनांत निघालेल्या रामाच्यामार्गे जाऊन परत आलेल्या लोकांची स्थिति. ) नष्ट झालेली वस्तु सांपडली असतां अथवा पुष्कळ द्रव्य मिळालें असतांही कोणाला आनंद होईनासा झाला व पहिल्याच खेपेस पुत्र झाला तरी मातेला आनंद होईनासा झाला. २३९ न स क्षमः कोपयितुं यः प्रसाद्यः पुनर्भवेत् ।
पूर्वोपकारं स्मरता कृतज्ञेन विशेषतः || ४ | ३२/२०
( हनुमान् सुग्रीवाला म्हणतो ) ज्याची पुनरपि कृपा संपादन करण्याचा प्रसंग यावयाचा असेल त्याला क्रोध आणणेंच योग्य नाहीं. विशेषतः स्वतःवर पूर्वी झालेला उपकार स्मरणाऱ्या कृतज्ञ पुरुषानें तर ही गोष्ट करितांच उपयोगी नाहीं. २४० न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः || ६ | १८|१५ ( सर्व वानरमंडळीकडे पाहून राम लक्ष्मणाला म्हणतो ) बाबारे, सर्वच भ्राते भरतासारखे नाहींत, पित्याचे सर्वच पुत्र माझ्यासारखे नाहींत किंवा तुमच्यासारखे मित्रही सर्वांना मिळत नाहींत.
For Private And Personal Use Only