Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०
६० नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् मयानुकूलेन नभस्वतेरितं
सार्थ श्री भागवतसुभाषितानि
पुमान्भवाब्धि न तरेत्स आत्महा || ११ | २० | १७
( भगवान् श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. ) सर्व उत्कृष्ट फळें प्राप्त करून देण्याचें मुख्य साधन हा नरदेह आहे. हा कोट्यवध उद्योगांनीही प्राप्त होणारा नाहीं तथापि सहज प्राप्त झाला आहे. ही नरदेहरूपी नौका चांगल्या प्रकारची आहे. गुरु हा तिच्या मधील नावाडी होय. वारा अनुकूल असला म्हणजे नाव चांगल्या तऱ्हेने चालते त्याप्रमाणें माझें स्मरण केलें असतां मी अनुकूल होऊन प्रेरणा करतों. अशा तऱ्हेची सर्व सामग्री असलेली ही नरदेहरूपी नौका प्राप्त झाली असतां, जो संसाररूपी सागर तरून जात नाहीं, तो आत्मघातकीच समजावा.
६१ नेह चात्यन्तसंवासः कर्हिचित्केनचित्सह ।
राजस्वेनापि देहेन किमु जायात्मजादिभिः १० ।४९।२०
( अक्रूर धृतराष्ट्र राजाला सांगतो. ) हे राजा, यालोकीं कोणत्याही प्राण्याचा कोणाही प्राण्याबरोबर केव्हांही निरंतर एकत्र सहवास घडत नाहीं. अत्यंत प्रिय असलेल्या आपल्या देहाबरोबर सुद्धां निरंतर सहवास घडत नाहीं, मग स्त्रीपुत्रादिकांबरोबर घडत नाहीं, हैं काय सांगावें ?
६२ नैकत्र प्रियसंवासः सुहृदां चित्रकर्मणाम् ।
जाणाऱ्या
ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां स्रोतसो यथा ।। १०/५/२५ ज्याप्रमाणें उदकप्रवाहाच्या ओघानें वाहून तृणकाष्ठादिकांची स्थिति एके ठिकाणीं घडत नाहीं, त्याप्रमाणें चित्रविचित्र कर्मे असणाऱ्या सुहृज्जनांचा प्रिय असलेला समागम एका ठिकाणी कायमचा घडत नाहीं.
For Private And Personal Use Only