Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 451
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थ श्री भागवतसुभाषितानि ८० महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्तेः ||५/५/२ सत्पुरुषांची सेवा करणें हेंच मुक्तीचें द्वार आहे. असें म्हणतात. ८१ मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम् । गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोऽविभ्रच्छ्रसन्मृतः ।। १०।४५/७ जो पुरुष पालनपोषण करण्यास समर्थ असूनही वृद्ध आईबापांचें, पतिव्रता स्त्रीचें, लहान पुत्राचें, गुरूचें, ब्राह्मणाचें, व शरणागताचें रक्षण करीत नाहीं, तो जिवंत असून मेल्यासारखाच होय. ८२ मातरं पितरं भ्रातृन्सर्वांश्च सुहृदस्तथा । मन्ति सुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ।। १०।१।६७ आपल्या प्राणांची तृप्ति करणारे व लोभी असलेले राजे बहुतकरून आई, बाप, भाऊ, त्याचप्रमाणें सर्वही मित्र यांचा सुद्धां वध करतात मग इतरांची कथा काय ? ८३ मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते । अद्य वाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ||१०|१|३८ २५ ( वसुदेव कंसाला म्हणाला. ) हे वीरा, जन्मास आलेल्या प्राण्यांचा मृत्यु देहाबरोबरच उत्पन्न होतो. आज किंवा शंभर वर्षांनी तरी प्राण्यांना मृत्यु हा निश्चित प्राप्त होणार. - ८४ मृत्युर्बुद्धिमताऽपोह्यो यावद्बुद्धिबलोदयम् । यद्यसौ न निवर्तेत नापराधोऽस्ति देहिनः || १०|१|४८ बुद्धिमान् पुरुषानें आपल्या बुद्धीची व बळाची पराकाष्टा करून प्राप्त झालेला मृत्यु चुकवावा. प्रयत्न करूनही मृत्यु टाळतां आला नाहीं, तर त्या प्राण्याकडे कांहीं दोष नाहीं. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 449 450 451 452 453 454 455 456 457 458 459 460 461 462 463