Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 456
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीभागवतसुभाषितानि १०० लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते ___ मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः । तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावत् निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात्॥११।९।२९ अनित्य असूनही सर्व पुरुषार्थ साधून देणारा म्हणूनच अत्यंत दुर्लभ असा नरदेह यालोकी पुष्कळ जन्म घेतल्यानंतर भाग्याने प्राप्त झाला असतां, हा वारंवार मरणारा आहे म्हणून जोपर्यंत हा पडला नाही, तोपर्यंतच धैर्यवान् पुरुषाने मोठ्या त्वरेनें मोक्ष मिळविण्यासाठी यत्न करावा. केवळ विषयसेवन हे श्वानसूकरादिक योनींमध्येही प्राप्त होतेच, त्यासाठी यत्न कशाला ? १०१ विक्रीडतोऽमृताम्भोधौ किं क्षुद्रैःखातकोदकैः ६।१२।२२ अमृताच्या सागरामध्ये क्रीडा करणाऱ्याला लहानशा खाचेतील ( खळग्यांतील) पाण्याचे काय महत्त्व आहे ? कांहींच नाही. १०२ श्रेयः कुर्वन्ति भूतानां साधवो दुस्त्यजासुभिः।।८।२०१७ साधु लोक त्याग करण्यास कठीण अशा प्राणांच्या योगानेही प्राण्यांवर उपकार करितात. १०३ षड्वर्गसंयमैकान्ताः सर्वा नियमचोदनाः॥७१५।२८ सर्वही नियमविधींचे पर्यवसान कामक्रोधादि सहा शत्रूचें संयमन करण्यामध्येच आहे. १०४ संसारेऽस्मिन्क्षणार्थोऽपि सत्सङ्ग शेवधिर्नृणाम्११।२।३० एखादा द्रव्याचा निधि प्राप्त झाला असतां जसा आनंद होतो, तसा या संसारामध्ये मनुष्यांना अर्धा क्षणभर सुद्धां घडलेल्या सत्समागमापासून आनंद होतो. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 454 455 456 457 458 459 460 461 462 463