Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 455
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीभागवतसुभाषितानि २९. २९. ९७ योऽनित्येन शरीरेण ___ सतां गेयं यशो ध्रुवम् । नाचिनोति स्वयं कल्पः स वाच्यः शोच्य एव सः॥१०॥७२।२० जो प्राणी स्वतः समर्थ असूनही आपल्या अनित्य शरीराने साधूंना गायन करण्यास योग्य असें शाश्वत यश संपादन करीत नाहीं, तो निंद्य होय व भाग्यहीनपणामुळे शोक करण्यासही योग्य होय. (त्याची कीव करावी तितकी थोडीच.) ९८ यो वा अनन्तस्य गुणाननन्तान् अनुक्रमिष्यन्स तु बालबुद्धिः। रजांसि भूमेर्गणयेत्कथंचित् कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः॥११॥४ार जो पुरुष अनंताच्या अनंत गुणांची गणना करण्यास तयार होईल तो मंदबुद्धि समजला पाहिजे. कारण कोणी एखादा महाबुद्धिमान पुरुष दीर्घकालपर्यंत मोठा प्रयत्न करून कदाचित् भूमीच्या रजःकणांची गणना करील, परंतु सर्व शक्तींचा आश्रय अशा भगवंताच्या गुणांची गणना करण्यास तो समर्थ होणार नाही. ९९ राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम् । शासतोऽन्यान् यथाशास्त्रमनापद्युत्पथानिह ॥१।१७।१६ आपत्काल नसतां भलत्याच मार्गाने (शास्त्रविरुद्धमार्गाने) जाणान्या अधार्मिक लोकांस यथाशास्त्र शासन करून स्वधर्मनिष्ठ सज्जनांचें निरंतर पालन करणे हाच राजाचा मुख्य धर्म होय. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 453 454 455 456 457 458 459 460 461 462 463