Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१८
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
mmarmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmwww.
५१ न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति । . हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ॥९।१९।१४
ज्याप्रमाणे अग्नि हा तूप इत्यादि हवनीय द्रव्यांच्या योगाने शांत न होतां अधिकच प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे विषयांच्या उपभोगाने विषय भोगण्याची इच्छा कधीही शांत होत नाही. उलट वाढतच जाते. ५२ न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः।
यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥११॥२३॥३ मर्मस्थळी लागलेल्या दुर्जनांच्या कठोर वाग्बाणांनी पुरुष दुःखाने जसा संतप्त होतो, तसा मर्मस्थानी लागलेल्या लोहमय खन्या बाणांनी विद्ध झालेलाही पुरुष संतप्त होत नाही. ५३ ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम् ।
यदि वेद न याचेत नेति नाह यदीश्वरः ॥ ६१०१६ (देव दधीचि ऋषींना म्हणतात.) खरोखर स्वार्थाविषयीं तत्पर असलेल्या लोकांना दुसन्याचे संकट समजत नाही. जर समजेल तर ते याचनाच करणार नाहीत, तसेंच ज्याच्यापाशी याचना केली, तो जर देण्यास समर्थ असेल व दुसऱ्याचे संकट जाणणारा असेल, तर 'देत नाही' असें कधींच म्हणणार नाही. ५४ न वै शूरा विकत्थन्ते दर्शयन्त्येव पौरुषम् ॥१०५०।२०
शूर पुरुष आपली स्वतःची स्तुति करीत नाहीत, तर स्तुतीला कारण असलेला पराक्रमच करून दाखवितात. ५५ न संरम्भेण सिध्यन्ति सर्वेऽर्थाःसान्त्वया यथा॥८।६।२४ सामोपचाराने जशी कार्ये सिद्ध होतात तशी रागाने होत नाहीत.
For Private And Personal Use Only