Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 445
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir mmmmmmmmmmm सार्थश्रीभागवतसुभाषितानि • ५६ न सभां प्रविशेत्प्राज्ञः सभ्यदोषाननुस्मरन् । अब्रुवन्विब्रुवन्नज्ञो नरः किल्बिषमश्नुते ॥ १०१४४।१० सभासदांचे दोष जाणणाऱ्या बुद्धिमान मनुष्याने आधीं सभेमध्येच जाऊ नये. कारण, दोष जाणूनही न बोलेल, किंवा धर्मपक्षाच्या उलट बोलेल, अथवा विचारिलें असतां मी जाणत नाही असें म्हणेल, तर त्याला पाप लागते. ५७ नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ॥ ६।११५३ कोणीही एक क्षणभर देखील कर्म केल्यावांचून कधीही राहूं शकत नाही. ५८ न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः। ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥ १०॥४८॥३१ उदकाने युक्त असलेली तीर्थे ही तीर्थे नव्हत, असें नाहीं, त्याचप्रमाणे मातीचे व दगडाचे देव हे देव नव्हत असें नाही, परंतु ही तीर्थे व हे देव पुष्कळ काळपर्यंत सेवा केली असतां पवित्र करतात आणि साधुलोक त्यांचे दर्शन होतांच पवित्र करतात. ५९ नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् । प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् ॥ १२॥१३॥२३ - ज्याचे नामसंकीर्तन केले असतां तें सर्व पातकांचा नाश करितें, व ज्याला नमस्कार केला असतां सकल दुःखांचा नाश होतो, त्या सर्वोत्तम श्रीहरीला मी नमस्कार करितों. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 443 444 445 446 447 448 449 450 451 452 453 454 455 456 457 458 459 460 461 462 463