Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२२
सार्थश्रीभागवत सुभाषितानि
६६ पुत्रदाराप्तवन्धूनां संगमः पान्थसंगमः ।। ११ ।१७/५३
पुत्र, स्त्री, आप्त आणि बांधव यांचा समागम केवळ पांथस्थ लोकांच्या सहवासासारखा क्षणिक आहे.
६७ पौरुषं दर्शयन्ति स्म शूरा न बहुभाषिणः || १० | ७७ १९
शूर पुरुष ( युद्धामध्यें ) पुष्कळ बोलून न दाखवितां आपला पराक्रमच करून दाखवितात.
६८ प्रभवो ह्यात्मनः स्तोत्रं जुगुप्सन्त्यपि विश्रुताः ४ । १५/२५ प्रख्यात असलेले समर्थ पुरुष आपल्या वर्णनीय पराक्रमाचीही स्तुति करवीत नाहींत. स्तुति ऐकण्याचा त्यांस कंटाळा येतो. ६९ प्रायेणाभ्यर्चितो देवो येऽप्रजा गृहमेधिनः ।
कदपत्यभृतं दुःखं ये न विन्दन्ति दुर्भरम् ||४|१३|४३
जे गृहस्थ निपुत्रिक आहेत त्यांनी बहुतकरून देवाचें चांगलें पूजन केले असले पाहिजे. कारण त्यांना कुपुत्रापासून होणारे अतिशय दुःसह दुःख मुळींच सोसावें लागत नाहीं. ( कुसंतानापेक्षां निसंतान बरें. )
७० बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥। ११ ।१८।२२ इंद्रियें विषयासक्त होणे हाच बंध व इंद्रियें विषयांपासून आवरून धरणें हाच मोक्ष होय.
७१ ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च ।। ११।१७/४२ ब्राह्मणाचा देह संसारांतील तुच्छ विषय भोगण्यासाठीं नाहीं, तर या लोकीं, जिवंत असेपर्यंत कष्ट करून तप करण्याकरितां, आणि मरण पावल्यानंतर परलोकीं अनंत सुख भोगण्याकरितां आहे.
For Private And Personal Use Only