Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४३३ विदितथास्तु भद्रं ते योऽयं रणपरिश्रमः।
सुतीर्णः सुहृदां वीर्यान्न त्वदर्थ मया कृतः॥६।११५।१५. रक्षता तु मया वृत्तमपवादं च सर्वतः। प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यङ्गं च परिमार्जता ॥
६११५।१६ ( राम सीतेला म्हणतो.) तुझें कल्याण असो. मित्रांच्या सामर्थ्यामुळे ज्याच्यांतून मी चांगल्या रीतीने पार पडलों, तो हा संग्रामासंबंधी खटाटोप तुझ्या करितां केलेला नाही. हे तुला माहीत असूं दे. आपले वर्तन कायम राखण्याकरितां, अपवाद सर्वस्वी टाळण्याकरितां आणि आपल्या प्रख्यात वंशाला आलेला कमीपणा. नाहींसा करण्याकरितां हा सर्व खटाटोप मी केला आहे. ४३४ विद्यते गोषु संपन्न विद्यते ज्ञातितो भयम् ।
विद्यते स्त्रीषु चापल्यं विद्यते ब्राह्मणे तपः॥६१६।९. (पद्मवनांत हत्तींनी म्हटलेले श्लोक रावण विभीषणाला सांगतो.) गाईचे ठिकाणी हव्यकव्यसाधनसंपत्ति, ज्ञातींचे ठिकाणी भय, स्त्रियांचे ठिकाणी चंचलता व ब्राह्मणाचे ठिकाणी तप ही. ठरलेलीच आहेत. ४३५ विनाशयन्ति भर्तारं सहिताः शत्रुभिर्बुधैः ।
विपरीतानि कृत्यानि कारयन्तीह मन्त्रिणः॥६६३।१७ विचारी शत्रूशी मिळून गेलेले कांहीं मंत्री धन्याचा नाश. करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडून विपरीत कृत्ये करवितात.
For Private And Personal Use Only