Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
९९
४६७ सत्यं बतेदं प्रवदन्ति लोके
नाकालमृत्युर्भवतीति सन्तः ॥ ५॥२८॥३ (सीता म्हणते. ) अकाली कोणालाही मरण येत नाही, म्हणून सत्पुरुष बोलतात, ते सत्य आहे. ४६८ सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मा।
पितृन्समनुजायन्ते नरा मातरमङ्गनाः॥२॥३५।२८ (सुमंत्र सारथि कैकेयीला म्हणतो.) पुरुष पित्याप्रमाणे होतात आणि स्त्रिया मातेप्रमाणे निपजतात, या लौकिक म्हणीची सत्यता ह्या तुझ्या आचरणांत तर मला अगदी खरोखर पटत आहे. ४६९ सदृशाच्चापकृष्टाच लोके कन्यापिता जनात् ।
प्रधर्षणमवामोति शक्रेणापि समो भुवि ॥ २॥११८३३५ कन्येचा पिता हा पृथ्वीवर इंद्रासारखा असला, तरी आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्याहून कमी योग्यतेच्याही वरपक्षाकडून त्याचा अपमान होतो. (मग योग्यतेने अधिक असलेल्या वरपक्षाची तर गोष्ट पाहिजे कशाला ?) । ४७० सन्तश्चारित्रभूषणाः॥६।११३।४२ ___ सज्जनांचे भूषण म्हणजे त्यांचे चारित्र्य होय. ४७१ संनिकांच सौहार्द जायते स्थावरेष्विव ।। २।८।२८
(मंथरा कैकेयीला म्हणते.)वृक्षलतादिकांचे ठिकाणी सांनिध्यामुळे जसें परस्परसंयोगरूप प्रेम वाढत असते, तसें मनुष्यांमध्येही सांनिध्यामुळेच प्रेम वाढत असते. ४७२ स भारः सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् ।
तदनमपि भोक्तव्यं जीर्यते यदनामयम् ।। ३।५०।१८ (जटायु रावणाला म्हणतो.) हे सौम्या, ज्याच्याखाली चिरडून जाण्याची पाळी येणार नाही, तो भार मनुष्याने उचलावा आणि अन्न तरी रोगोत्पत्ति न होतां जें जिरेल तेच खावें.
For Private And Personal Use Only