Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४७० सर्वकर्माणि संत्यज्य कुर्यात्सजनसङ्गमम् । ___ एतत्कर्म निराबाधं लोकद्वितयसाधनम् ॥ ७९८१२३
सर्व कर्मे सोडून प्रथम सज्जनांचा सहवास करावा. सत्समागम हा उपाय मुळीच त्रासदायक नसून इहलोक व परलोक साधून देणारा आहे. ४७१ सर्व काले हि शोभते ॥ ३।६७६१
सर्व गोष्टी योग्यवेळीच शोभत असतात. ४७२ सर्वज्ञोऽपि बहुज्ञोऽपि माधवोऽपि हरोऽपि च । __अन्यथा नियतिं कर्तुं न शक्तः कश्चिदेव हि ॥५।८९।२६ कोणी एखादा सर्वज्ञ असो, बहुज्ञ असो, स्वतः भाग्यवान् विष्णु असो, किंवा शंकर असो नियतीला म्हणजे सृष्टिनियमाला बदलण्यास कोणीही समर्थ नाही. ४७३ सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
यदा पश्यत्यभेदेन तदा जीवो विमुच्यते ॥६।१२८१४९ सर्वभूतांमध्ये आत्म्याला व आत्म्यामध्ये सर्व भूतांना हा जीव जेव्हां अभेदाने पाहतो तेव्हां तो मुक्त होतो. ४७४ सर्वमेवेह हि सदा संसारे रघुनन्दन ।
सम्यक्प्रयुक्तात्सर्वेण पौरुषात्समवाप्यते ॥२१४८ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, या संसारांत योग्य दिशेने प्रयत्न केला असतां सर्वांना नेहमी वाटेल ती वस्तु प्राप्त करून घेता येते. ४७५ सर्व ब्रह्मेति यो ब्रूयादप्रबुद्धस्य दर्मतेः।
स करोति सुहृवृत्त्या स्थाणोर्दुःखनिवेदनम् ॥६।४९।२० दुष्टबुद्धीच्या मूर्ख मनुष्याला ‘हे सर्व ब्रह्मच आहे' असें जो सांगतो, तो, जड खांबाला आपला मित्र समजून आपले दुःख सांगतो; असेंच म्हटले पाहिजे.
For Private And Personal Use Only