Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 415
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ~~ ~~~~~~~~ ४८२ सर्वेषु सुखदुःखेषु सर्वासु कलनासु च । मनःकते मनो भोक्त मानसं विद्धि मानवम्।।३।११५।२४ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, सर्व सुखदुःखांचे आणि कल्पनांचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व मनाकडे आहे. यासाठी मन म्हणजेच मनुष्य हे लक्षात ठेव. ४८३ सर्वैव लोकयात्रेयं प्रोता तृष्णावरत्रया । रज्जुबन्धाद्विमुच्यन्ते तृष्णाबन्धान केचन॥५।१५।२३ हे सर्व लोकसमुदाय तृष्णारूपी चामड्याच्या वादीमध्ये ओवले गेले आहेत. इतर कसल्याही दोरीने बद्ध झालेला मनुष्य त्या बंधापासून मुक्त होऊ शकतो, परंतु तृष्णेच्या बंधांतून कोणीही सहसा मुक्त होऊ शकत नाही. ४८४ सलिलं स्थलतां याति स्थलीभवति वारिभूः। विपर्यस्यति सर्व हि सकाष्ठाम्बुतृणं जगत् ॥ १२२८९ ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी काही काळाने भूमि दिसते; व ज्या ठिकाणी भूमि असते, त्या ठिकाणी काही दिवसांनी पाणी दिसू लागते. अशारीतीने काष्ठ, उदक आणि तृण यांनी युक्त असलेले जग कालमानाने बदलत असते. ४८५ सहस्रेभ्यः सहस्रेभ्यः कश्चिदुत्थाय वीर्यवान् । भिनत्ति वासनाजालं पञ्जरं केसरी यथा ॥ ७/१९४१३९ ज्याप्रमाणे सिंह पिंज-यांतून बाहेर पडतो, त्याप्रमाणे हजारों लोकांतील एखादाच सामर्थ्यवान् पुरुष वासनेचे जाळें तोडून मोकळा होतो. ४८६ साधुसंगतयो लोके सन्मार्गस्य च दीपिकाः॥२॥१६९ या जगामध्ये साधूंचा समागम हा सन्मार्ग दाखविणारा दिवा आहे. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 413 414 415 416 417 418 419 420 421 422 423 424 425 426 427 428 429 430 431 432 433 434 435 436 437 438 439 440 441 442 443 444 445 446 447 448 449 450 451 452 453 454 455 456 457 458 459 460 461 462 463