________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
~~
~~~~~~~~
४८२ सर्वेषु सुखदुःखेषु सर्वासु कलनासु च ।
मनःकते मनो भोक्त मानसं विद्धि मानवम्।।३।११५।२४ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, सर्व सुखदुःखांचे आणि कल्पनांचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व मनाकडे आहे. यासाठी मन म्हणजेच मनुष्य हे लक्षात ठेव. ४८३ सर्वैव लोकयात्रेयं प्रोता तृष्णावरत्रया ।
रज्जुबन्धाद्विमुच्यन्ते तृष्णाबन्धान केचन॥५।१५।२३ हे सर्व लोकसमुदाय तृष्णारूपी चामड्याच्या वादीमध्ये ओवले गेले आहेत. इतर कसल्याही दोरीने बद्ध झालेला मनुष्य त्या बंधापासून मुक्त होऊ शकतो, परंतु तृष्णेच्या बंधांतून कोणीही सहसा मुक्त होऊ शकत नाही. ४८४ सलिलं स्थलतां याति स्थलीभवति वारिभूः।
विपर्यस्यति सर्व हि सकाष्ठाम्बुतृणं जगत् ॥ १२२८९ ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी काही काळाने भूमि दिसते; व ज्या ठिकाणी भूमि असते, त्या ठिकाणी काही दिवसांनी पाणी दिसू लागते. अशारीतीने काष्ठ, उदक आणि तृण यांनी युक्त असलेले जग कालमानाने बदलत असते. ४८५ सहस्रेभ्यः सहस्रेभ्यः कश्चिदुत्थाय वीर्यवान् ।
भिनत्ति वासनाजालं पञ्जरं केसरी यथा ॥ ७/१९४१३९ ज्याप्रमाणे सिंह पिंज-यांतून बाहेर पडतो, त्याप्रमाणे हजारों लोकांतील एखादाच सामर्थ्यवान् पुरुष वासनेचे जाळें तोडून मोकळा होतो. ४८६ साधुसंगतयो लोके सन्मार्गस्य च दीपिकाः॥२॥१६९
या जगामध्ये साधूंचा समागम हा सन्मार्ग दाखविणारा दिवा आहे.
For Private And Personal Use Only