________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४७६ सर्वस्य जन्तुजातस्य सर्ववस्त्ववभासने ।
सर्वदेवैक एवोच्चैर्जयत्यभ्यासभास्करः ॥७६७।४१ __ सर्व प्राण्यांना कोणतीही वस्तु सर्वदा भासविणारा एक अभ्यासरूपी सूर्यच सर्वोत्कृष्ट आहे. ४७७ सर्वस्य बीजे संत्यक्ते सर्व त्यक्तं भवत्यलम् ॥६।९३३३५ . सर्वांचे बीज टाकले असतां सर्वांचा त्याग पूर्णपणे केल्यासारखा होतो. ४७८ सर्वस्याः सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात् ।
देहनद्याः पयस्त्वायुर्यात्येवायाति नो पुनः।।७।९३।४८ सर्व नद्यांचे पाणी जरी वाहून जात असले, तरी ते पुनः मेघ, पर्वत इत्यादिकांपासून येत असते. परंतु या देहरूपी नदीतील आयुष्यरूपी पाणी एकसारखें जात मात्र असते, पण त्यांत दुसरी कडून भर पडत नाही. ४७९ सर्वः स्वसंकल्पवशाल्लघुर्भवति वा गुरुः ॥ ३७०१३०
जो तो प्राणी आपल्या संकल्पाच्या योगाने उच्च किंवा नीच स्थिति प्राप्त करून घेत असतो. ४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ताः सर्वे संसारवमनि ॥५।८६५५ या संसारांत सर्व संग्रहांचा शेवटी नाश होतो, उंचावर चढलेले अखेरीस पतन पावतात, आणि ज्यांचा संयोग झाला असेल, त्या सर्वांचा शेवटी वियोग होतो. ४८१ सर्वेषामेव धर्माणां कर्मणां शर्मणामपि ।
पण्डितः पुण्डरीकाणां मार्तण्ड इव मण्डनम् ।। ७।१४३।१ आकाशाचे भूषण असलेला सूर्य ज्याप्रमाणे कमलांना विकसित करतो, त्याप्रमाणे सभेचे भूषण असलेला पंडित सर्व धर्माचा, कर्माचा, आणि सुखांचा निर्णय करतो.
For Private And Personal Use Only