Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
annnnnnnnnnnnn
४ अण्वप्युपाहृतं भक्तैः प्रेम्णा भूर्येव मे भवेत् ।
भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥ १०८११३ (श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणाले.) भक्तांनी प्रेमाने अर्पण केलेली वस्तू जरी थोडी असली तरी ती मला पुष्कळ वाटते. आणि अभक्तांनी पुष्कळ वस्तू जरी अर्पण केल्या, तरी त्यापासून मला संतोष होत नाही. ५ अनागतमतीतं च वर्तमानमतीन्द्रियम् ।
विप्रकृष्टं व्यवहितं सम्यक् पश्यन्ति योगिनः१०६१।२१ पुढे होणाऱ्या, पूर्वी झालेल्या आणि वर्तमानकाळी इंद्रियांना न समजणान्या, दूर असलेल्या, मध्ये पडदा, भिंत इत्यादि व्यवधान असल्यामुळे न दिसणान्या सर्व वस्तूंना योगी लोक प्रत्यक्ष पाहतात.
६ अनापृष्टमपि ब्रूयुर्गुरवो दीनवत्सलाः ॥ ३७३६ दीनांवर दया करणारे गुरु न विचारलेल्यादेखील गोष्टींबद्दल सांगत असतात.
७ अयं हि परमो लाभो नृणां साधुसमागमः॥१२॥१०७. साधूंचा समागम घडणे हा मनुष्यांना मोठाच लाभ होय. ८ अरयोऽपि हि संधेयाः सति कार्यार्थगौरवे ।
अहिमूषकवद्देवा ह्यर्थस्य पदवीं गतैः ॥ ८।६।२० (समुद्रमंथनाचेपूर्वी दैत्यांशी सख्य करा, असें भगवान् विष्णूंनी देवांना सांगितले.) देवहो, एखादे मोठे कार्य घडवून आणण्यासाठी शत्रंबरोबर सुद्धा मैत्री केली पाहिजे. ती तुम्ही करा आणि तुमचा कार्यभाग झाल्यावर, सर्प उंदरांना गिळून टाकतो त्याप्रमाणे दैत्यांचा नाश करा.
For Private And Personal Use Only