Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१७ उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते । ___ अपि निमुक्तसङ्गस्य कामरक्तस्य किं पुनः॥३॥२२॥१२
सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरुषाला देखील स्वतः प्राप्त झालेल्या विषयाचा अव्हेर करणे योग्य नाही, मग विषयासक्त पुरुषाला तो कोठून योग्य होईल ? १८ एकः प्रसूयते जन्तुरेक एव प्रलीयते ।
एकोऽनुभुङ्क्ते सुकृतमेक एव च दुष्कृतम् ॥१०॥४९।२१ प्राणी एकटाच जन्मास येतो, (स्त्रीपुत्रादिकांसह जन्मास येत नाही) व एकटाच मरण पावतो. तसेंच पुण्याचे फळ सुख, एकटाच भोगतो व पापाचे फळ दुःखसुद्धा एकटाच भोगितो. १९ एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम् ।
यद्वै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ ॥ १०८०४१ उत्तम शिष्यांनी गुरूंच्या उपकारांची फेड हीच करावी की, सर्व पुरुषार्थ ज्यापासून प्राप्त होतात, तो देह शुद्धभक्तीने गुरूंना अर्पण करावा. २० एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरि पुत्रकैः ।
बाढमित्यनुमन्येत गौरवेण गुरोर्वचः ॥३॥२४॥१३ मुलांनी वडिलांची सेवा करावयाची म्हणजे एवढेच की, त्यांच्या आज्ञेचा स्वीकार 'ठीक आहे ' अशा बहुमानाने करावयाचा. २१ एतावानव्ययो धर्मः पुण्यश्लोकैरुपासितः।
यो भूतशोकहर्षाभ्यामात्मा शोचति हृष्यति ॥६॥१०९ प्राणिमात्राला दुःख झाले असतां, ज्याला स्वतःला दुःख होतें, व प्राणिमात्राचे सुख पाहून ज्याला सुख होते, अशा पुरुषाचा जो धर्म, तोच अक्षय धर्म होय. कारण सत्कीर्तिमान लोकांनी याच धर्माचे आचरण केले आहे.
For Private And Personal Use Only