Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री भागवतसुभाषितानि
९ असतः श्रीमदान्धस्य दारिद्र्यं परमञ्जनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ।। १०।१०।१३
संपत्तीच्या मदानें अंध झाल्यामुळे कर्तव्याकर्तव्य न पाहणाऱ्या विवेकशून्य पुरुषाला दारिद्र्य हेंच उत्तम अंजन होय. कारण, दरिद्री पुरुष आपल्यासारखींच दुःखें सर्वाना प्राप्त होत असतील असें निश्चयानें जाणतो.
१० अहं भक्तपराधीनो स्वतंत्र इव द्विज || ९|४|६३
( श्रीभगवान् विष्णु सुदर्शन चक्रानें पीडित झालेल्या दुर्वास ऋषींना म्हणाले. ) हे ब्राह्मणा, मी भक्ताच्या अधीन आहे, यामुळें तुझ्या रक्षणाविषयीं स्वतंत्र असल्यासारखा नाहीं.
११ अहो दैन्यमहो कष्टं पारक्यैः क्षणभङ्गुरैः ।
यनोपकुर्यादस्वार्थैर्मर्त्यः स्वज्ञातिविग्रहैः ।। ६।१०।१०
द्रव्य, पुत्रादिक बांधव व शरीर यांची स्थिति अशी आहे कीं, यांचा स्वतःला उपयोग होत नाहीं, यांना कोल्हीं कुत्रों खाऊन टाकणार व यांचा क्षणाचाही भरंवसा नाहीं. तेव्हां यांच्या योगानें मनुष्यानें कोणावरही उपकार न करणें ही किती तरी दैन्याची व दुःखाची गोष्ट आहे !
१२ आयुः श्रियं यशो धर्म लोकानाशिष एव च ।
हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः || १० |४ |४६ सज्जनांचा छळ केला असतां, मनुष्याचें आयुष्य, संपत्ति, यश, धर्म, उत्तमलोकप्राप्ति. आशीर्वाद, कल्याणकारक गोष्टी या सर्वांचा नाश होतो.
For Private And Personal Use Only