Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१३ आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ॥११८४४
आशा धरणे हे अतिशय दुःखाचे कारण आहे. आणि आशा नसणे हे परम सुखाचे कारण आहे. १४ इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः।
वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥ ११।८।२० आहाराचा त्याग करणारे विचारी पुरुष रसनेंद्रियाशिवाय बाकीच्या सर्व इंद्रियांना जिंकतात. परंतु अन्नरहित पुरुषाचे रसनेंद्रिय वाढत जाते. (रसाविषयीं अधिक आसक्ति उत्पन्न होते.) १५ ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् ।
तेषां यत्स्ववचोयुक्तं बुद्धिमांस्तत्समाचरेत् १०॥३३॥३२ कुशलाचरितेनैषामिह स्वार्थो न विद्यते ।
विपर्ययेण वाऽनर्थो निरहंकारिणां प्रभो ॥१०॥३३३३३ (शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात.) ज्ञानी समर्थ पुरुषांचे भाषण सत्य असते. उपदेशाप्रमाणे त्यांचे आचरण क्वचित् असते. म्हणून बुद्धिमान मनुष्याने त्यांच्या उपदेशाला अनुसरून असलेल्या आचाराचे आचरण करावे. हे राजा, अशा अहंकार नसलेल्या पुरुषांना धर्माप्रमाणे आचरण करून या लोकीं कांहीं सुखप्राप्ति करून ध्यावयाची नसते, किंवा त्यांच्या हातून अधर्माचरण घडल्यास त्यांना परलोकी दुःखही प्राप्त होणारे नसते. १६ उत्तमश्चिन्तितं कुर्यात्प्रोक्तकारी तु मध्यमः।
अधमोऽश्रद्धया कुर्यादकर्वोच्चरितं पितुः ॥ ९।१८।४४ जो मुलगा बापाच्या मनांत असलेले कार्य करतो तो उत्तम, जो सांगितलेले करतो तो मध्यम, जो सांगितलेले अश्रद्धेने करतो तो कनिष्ठ आणि जो बापाचे सांगणे अश्रद्धेनेसुद्धा करीत नाही, तो केवळ विष्ठेसारखाच होय.
For Private And Personal Use Only