Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४८७ साधूपदिष्टमार्गेण यन्मनोऽङ्गविचेष्टितम् ।
तत्पौरुषं तत्सफलमन्यदुन्मत्तचेष्टितम् ॥ २।४।११ सत्पुरुषांनी आंखून दिलेल्या मार्गाने काया, वाचा आणि मन यांनी जें कर्म केले जाते, तेच पौरुष होय. अशा पौरुषानेच फलप्राप्ति होते. याशिवाय केलेले इतर कर्म उन्मत्त मनुष्याच्या कर्माप्रमाणे निष्फल होते. ४८८ सिंहवत्सर्ववेगेन पतन्त्यर्थे किलार्थिनः ॥ ३१७८०६ __ कार्य साधणारे लोक आपल्या कार्यावर सिंहाप्रमाणे एकदम झडप घालीत असतात. ४८९ सीमान्तं सर्वदुःखानामापदां कोशमुत्तमम् ।
बीजं संसारवृक्षाणां प्रज्ञामान्धं विनाशयेत् ॥५।१२।२७ सर्व दुःखांची पराकाष्ठा, आपत्तीचे मोठे भांडार, व संसारवृक्षाचें बीज, अशा प्रकारच्या बुद्धिमांद्याचा नाश करावा. ४९० सुनिर्मलापि विस्तीर्णा पावन्यपि हि यौवने ।
मतिः कलुषतामेति प्रावृषीव तरङ्गिणी ॥ १।२०।१८ पावसाळ्यांत नदीचे पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे बुद्धि कितीही निर्मल, उदार आणि शुद्ध असली, तरी ती तारुण्यांत मलिन होते. ४९१ सुभगाः सुलभारोहाः फलपल्लवशालिनः । __ जायन्ते तरवो देशे न तु चन्दनपादपाः॥१॥३३॥४० दिसण्यांत सुंदर आणि चढण्याला सुलभ असे फल आणि पल्लव यांनी युक्त असलेले वृक्ष सर्वत्र दिसून येतात; परंतु चंदनाचे वृक्ष मात्र विरळा होत.
For Private And Personal Use Only