Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww
२४३ न सजनारतरः क्वचिद्भवे
द्भजेत साधून्विनयक्रियान्वितः । स्पृशन्त्ययत्नेन हि तत्समीपगं
विसारिणस्तद्गतपुष्परेणवः ॥ ७९८।२४ सज्जनांपासून केव्हाही दूर राहूं नये, नम्रतापूर्वक त्यांची सेवा करावी. कारण, सज्जनांच्याजवळ राहणाराला त्यांच्या गुणरूपी पुष्पांतील पसरणाऱ्या रजःकणाचा लाभ अनायासे होतो. २४४ न स्तौमि न च निन्दामि कचित्किंचित्कदाचन ।
आत्मनोऽन्यस्य वा साधो तेनाहं शुभमागतः ६।२६।१३ (भुशुंड श्रीवसिष्ठांना म्हणतो) मी केव्हाही व कोठेही थोडीसुद्धा आपली स्तुति करीत नाही व दुसऱ्याची निंदा करीत नाहीं त्यामुळे मला कल्याणकारक स्थिति प्राप्त झाली आहे. २४५ न स्वकर्म विना श्रेयः प्रामुवन्तीह मानवाः॥५।४८।६९
स्वकर्माचे अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्यांना या जगांत श्रेय प्राप्ति होत नाही. २४६ न स्वधैर्यादृते कश्चिदभ्युद्धरति संकटात् ॥५।२१।१०
स्वतःच्या धैर्यावांचून आपणाला संकटांतून कोणीही पार पाडणार नाही. २४७ न हि चन्द्रं विना शुद्धा सविकासा कुमुद्वती ॥२॥१२॥६ चंद्रावांचून श्वेत कमलिनी विकास पावत नाही.
यो. वा. ४
For Private And Personal Use Only