Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३२५ मन एव समर्थं वो मनसो दृढनिग्रहे ।
अराजा का समर्थः स्याद्राज्ञो राघव निग्रह।।३।११२।१९ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) श्रोतृजनहो, तुमच्या मनाचा दृढनिग्रह करण्याला तुमचे मनच समर्थ आहे. हे राघवा, राजाचा निग्रह करण्याला जोराजा नाही,असा कोणतासामान्य मनुष्य समर्थ होईल? ३२६ मनाकृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतम् ॥ ३४८९।१
मनाने में केलें तेच खरोखर केलेले असे समजावें; केवळ शरीराने केले, तें केलें असें म्हणतां येत नाही. ३२७ मनो हि न जडं राम नापि चेतनतां गतम् ॥३९६३७
(श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, मन हे धड जडही नाही, आणि चेतनही नाही. ३२८ मरणस्य मुने राज्ञो
जराधवलचामरा। आगच्छतोऽग्रे निर्याति
स्वाधिव्याधिपताकिनी ॥ १।२२।३० (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो ) मरण हा एक राजा असून त्याची स्वारी आपल्याकडे येऊ लागली, म्हणजे त्याच्या अगोदर आधिव्याधिरूपी सेना बाहेर पडत असून जरारूपी पांढरी चवरी पुढे दिसू लागते. ३२९ महतां दर्शनं नाम न कदाचन निष्फलम् ॥३।२६।३९
महात्म्यांचे दर्शन केव्हाही निष्फळ होत नाही. ३३० महतामेव संपर्कात्पुनदुःखं न बाधते ।
को हि दीपशिखाहस्तस्तमसा परिभूयते ॥ ३१८२८ जळणारी मशाल हातांत असली म्हणजे अंधारांत चांचपडण्याचा कोणालाही प्रसंग येत नाही, त्याप्रमाणे महात्म्यांचा सहवास झाल्यावर कोणालाही दुःख भोगण्याचा प्रसंग येत नाही.
यो. वा. ५
For Private And Personal Use Only