Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४२१ विविधवनकुसुमकेसरधवलवपुहंस इव दृष्टः। काकः कृमिकुलकवलं क्लिनमथो कवलयन् ज्ञातः७११६३६५
वनांतील नानाप्रकारच्या पुष्पपरागांनी शुभ्र झालेला कावळा हंसासारखा जरी वाटला, तरी किड्यांनी भरलेलें व माखून गेलेले मांस खाण्यासाठी तो उचलून घेत आहे असें दिसल्याबरोबर हा कावळाच आहे अशी खात्री झाली. ४२२ विवेकोऽस्ति वचस्येव चित्रेऽग्निरिव भास्वरः।
यस्य तेनापरित्यक्ता दुःखायैवाविवेकिता॥४।१८।६७ ज्याचा विवेक बोलण्यांतच मात्र आहे, त्याला चित्रांतील अग्नीप्रमाणे विवेकाचा मुळीच उपयोग होत नाही. त्याच्या ठिकाणी अविवेकच असल्यामुळे त्यापासून दुःख होतें.. ४२३ विश्वामित्रेण मुनिना दैवमुत्सृज्य दूरतः।
पौरुषेणैव संप्राप्तं ब्राह्मण्यं राम नान्यथा ॥२।८।२० (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, विश्वामित्र मुनींनी दैव दूर बाजूला झुगारून देऊन केवळ पौरुषाच्याच बलावर ब्राह्मण्य प्राप्त करून घेतले. ४२४ विषं विषयवैषम्यं न विषं विषमुच्यते ।
जन्मान्तरना विषया एकदेहहरं विषम् ॥ १।२९।१३ ज्याला आपण विष म्हणून म्हणतो, तें वास्तविक विष नसून विषय हेच खरें विष होय. विषप्राशन केले असतां एका देहाचा नाश होतो, परंतु विषयांचे सेवन हे अनेक जन्मांचा नाश करतें. ४२५ विषयान्प्रति भोः पुत्र सर्वानेव हि सर्वथा । ___ अनास्था परमा ह्येषा सा युक्तिमनसो जये ॥५।२४।१७
(विरोचन बलीला म्हणतो) हे पुत्रा, सर्व विषयांसंबंधानें पूर्णपणे अनास्था असणे हीच मनोजयाची सर्वोत्कृष्ट युक्ति आहे.
For Private And Personal Use Only