Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४३६ शिष्यप्रज्ञैव बोधस्य कारणं गुरुवाक्यतः॥६।१२८।६३
ज्ञान होण्याला गुरुवाक्यापेक्षा शिष्याची बुद्धिच अधिक कारण आहे. ४३७ शुद्धेऽल्पोऽप्युपदेशो हि निर्मले तैलबिन्दुवत् ।
लगत्युत्तानचित्तेषु नादशे इव मौक्तिकम् ॥ ७।५।३ तेलाचा थेंब निर्मल वस्त्रावर पडला असतां आंत शिरून जसा पसरतो तसा थोडाही उपदेश शुद्ध चित्तामध्ये चांगल्या रीतीने बिंबतो, परंतु चित्त गंभीर नसल्यास आरशांत पडलेल्या मोत्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे उपदेश ठसत नाही. ४३८ शुभवासनया चेतो महत्या जायते महत् ।
भवतीन्द्रमनोराज्य इन्द्रतास्वप्नभाङ्नरः ॥४॥३५।३० शुभ वासनेमुळे मन शुभ होते, आणि मोठ्या वासनेमुळे मनही मोठे होते. 'मी इंद्र होईन ' असें मनोराज्य करणारा स्वप्नामध्ये इंद्र होतो. ४३९ शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां वहन्ती वासनासरित् ।
पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि ॥२।९।३० वासनारूपी नदी शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही मार्गांनी वाहत असते. आपल्या वासनेचा प्रवाह अशुभमार्गाने जात आहे असे दिसून आल्यास प्रयत्न करून तो प्रवाह शुभ मार्गाकडे वळवावा. ४४० शून्यमाकीर्णतामेति मृतिरप्युत्सवायते ।
आपत्संपदिवाभाति विद्वञ्जनसमागमे ॥ २१६।३ विद्वान लोकांच्या सहवासांत असणा-याला एखादें शून्यस्थानही मनुष्यांनी गजबजल्याप्रमाणे दिसते, मृत्युही उत्सवाप्रमाणे आनंददायक वाटतो. व आपत्तीलाही त्याच्या दृष्टीने संपत्तीचे स्वरूप प्राप्त होते.
For Private And Personal Use Only