Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानिं
*४२६ वृक्षाः प्रतिवनं सन्ति नित्यं सफलपल्लवाः । नत्वपूर्वचमत्कारो लवङ्गः सुलभः सदा ॥ १।३३।४१
प्रत्येक वनामध्यें फळांनीं व फुलांनीं भरलेले असे शेंकडों वृक्ष आढळून येतात. परंतु आश्चर्यकारक लवंगवृक्ष एखादाच आढळतो.
८३
४२७ व्याचष्ट यः पठति च शास्त्रं भोगाय शिल्पिवत् ।
यतते न त्वनुष्ठाने ज्ञानबन्धुः स उच्यते ।। ७।२१।३
कारागीर द्रव्य मिळविण्यासाठीं प्रयत्न करतो, त्याप्रमाणें -उपभोग मिळविण्यासाठीं जो शास्त्र पढतो व त्याचें व्याख्यान करतो, पण स्वतः त्याप्रमाणें वागण्याविषयीं झटत नाहीं, तो ज्ञानबंधु म्हणजे नांवाचाच ज्ञानी होय.
४२८ शतादेकतमस्यैव सर्वोदारचमत्कृतिः ।
ईप्सितार्थापणैकान्तदक्षा भवति भारती || १।३३।३२
शेंकडों वक्त्यांमध्ये एकाद्याचेंच भाषण सहृदय मनुष्यांच्या अंतःकरणांत विस्मय उत्पन्न करणारे आणि इच्छिलेल्या अर्थाचा निश्चयानें बोध करणारें असतें.
४२९ शमेनासाद्यते श्रेयः शमो हि परमं पदम् ॥। २।१३।५२ शमानेंच मोक्ष प्राप्त होतो. व शम हेंच श्रेष्ठपद आहे. ४३० शरदम्बुधरच्छायागत्वर्यो यौवनश्रियः ।
आपातरम्या विषयाः पर्यन्तपरितापिनः ।। ७।९३।८४
शरतूंतील मेघांच्या छायेप्रमाणें तारुण्याची शोभा क्षणिक आहे, आणि शब्दादिविषय वरवर सुखदायक खरे; परंतु शेवटीं अत्यंत दुःखदायक होत.
For Private And Personal Use Only