Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ७५ ३८३ युक्त्या प्रबोध्यते मूढः प्राज्ञस्तत्त्वेन बोध्यते॥६॥४९।२१
मूढाला युक्तीने बोध करावा लागतो व जाणत्याला तत्त्व सांगून बोध करावा लागतो. ३८४ युक्त्यैव बोधयित्वैष जीव आत्मनि योज्यते । __यद्युक्त्यासाद्यते कार्य न तद्यत्नशतैरपि ॥ ६४९।१९
युक्तीनेच बोध करून या जीवाला आत्मप्राप्ति करून द्यावी लागते. कारण जें कार्य युक्तीने साधतें तें शेकडो प्रयत्नांनीही साधत नाही. ३८५ युज्यते वेष्टनं वायोराकाशस्य च खण्डनम् ।
ग्रथनं च तरङ्गाणामास्था नायुषि युज्यते ॥ १।१४।५ वाऱ्याची गुंडाळी करता येते, आकाशाचे तुकडे करता येतात, पाण्यावरील लाटांना एकत्र ओंवतां येते. इत्यादि गोष्टींवर एकवेळ विश्वास बसेल, परंतु आयुष्यावर विश्वास बसत नाही. ३८६ ये केचन समारम्भा ये जनस्य क्रियाक्रमाः।
ते सर्वे देहमात्रार्थमात्मार्थं न तु किंचन ॥४५७/३१ बाह्य विषयांवर दृष्टि ठेवणारे लोक सर्व वैदिक किंवा लौकिक कमें केवळ देहाच्या सुखासाठी करीत असतात; परंतु आत्मज्ञानासाठी मुळींच प्रयत्न करीत नाहीत. ३८७ येन नासादितं हेम रीतिं किं स परित्यजेत् ॥६१०१।४०
ज्याला सोन्याची माहितीच नाहीं तो पितळ मिळविण्याच्याच मार्गात असणार. ३८८ येन प्राप्तेन लोकेऽस्मिन्न प्राप्यमवशिष्यते ।
तत्कृतं सुकृतं मन्ये शेष कर्म विषूचिका ॥ ६७४।१७ (भगीरथ म्हणतो) जें प्राप्त झाले असतां या लोकांत कांहीं अधिक मिळावयाचें राहात नाही, तेच करणे याला मी 'सुकृत' समजतो. बाकीचें कर्म म्हणजे पटकीप्रमाणे अपवित्र व दुःखदायक होय.
For Private And Personal Use Only