Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७४
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३७७ यावत्सर्वं न संत्यक्तं तावदात्मा न लभ्यते ।
सर्वावस्थापरित्यागे शेष आत्मेति कथ्यते ॥५।५८१४४ जोपर्यंत मनाने सर्व विषयांचा पूर्णपणे त्याग केला नाही, तोपर्यंत कोणालाही आत्मप्राप्ति होणार नाही. कारण मनाच्या सर्व अवस्थांचा त्याग झाल्यानंतर अवशिष्ट राहणारातोच आत्मा, असा सिद्धांत आहे. ३७८ यावदन्यन्न संत्यक्तं
तावत्सामान्यमेव हि । वस्तु नासाद्यते साधो
स्वात्मलामे तु का कथा ॥ ५।५८।४५ (मांडव्य ऋषि सुरघु राजाला म्हणतात.) सामान्य व्यवहारामध्ये देखील एखादी क्षुद्र वस्तु तिच्या विरोधी वस्तूंचा त्याग केल्याशिवाय हाती लागत नाही, असा नियम आहे. तर आत्मलाभाच्या संबंधाने हा नियम विशेषच लागू पडावा, यांत काय आश्चर्य आहे ? ३७९ यावदेहं स्वभावोऽस्य देहस्य न निवर्तते ॥३७६।५
जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत त्याचे धर्म नाहीसे होत नाहीत. ३८० या विवेकविकासिन्यो मतयो महतामिह ।
नता विपदि मजन्ति तुम्बकानीव वारिणि ।।२।१४।११ भोपळा पाण्यात बुडत नाही, त्याप्रमाणे विवेकाने विकास पावलेली महात्म्यांची बुद्धि विपत्काळी निराशेत बुडून जात नाही. ३८१ युक्तियुक्तमुपादेयं वचनं बालकादपि । __ अन्यत्तृणमिव त्याज्यमप्युक्तं पद्मजन्मना ॥ २।१८।३ एखाद्या मुलानेही केलेले सयुक्तिक भाषण ग्राह्य समजावें, परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेही केलेले भाषण युक्तीच्या विरुद्ध असल्यास तें त्याज्य समजावे. ३८२ युक्त्या च व्यवहारिण्या स्वार्थःप्राज्ञेन साध्यते३।७८।२५ ज्ञाते लोक आपले कार्य व्यवहार्य युक्तीने साधीत असतात.
For Private And Personal Use Only