Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४०० राग एव हि शोभायै
निर्गुणानां जडात्मनाम् ।। ७।१२०।१० (हा फुललेला पळसाचा वृक्ष केवळ रंगीत फुलांच्या योगानें राजासारखा शोभत आहे, त्याप्रमाणे ) खरी शोभा देणारे औदार्यादि गुण सूर्याच्या ठिकाणी नसल्यामुळे शोभा आणण्यासाठी त्यांना केवळ रंगीत वस्त्रालंकारच धारण करावे लागतात. ४०१ राजते हि पदार्थश्रीमहतामर्पणाच्छुभा ॥ ३॥१०४।३७ ___ एखादा मूल्यवान् चांगला पदार्थ योग्य असलेल्या थोर लोकांना अर्पण केला असतां शोभू लागतो. ४०२ राज्यानि संपदः स्फारा भोगो मोक्षश्च शाश्वतः ।
विचारकल्पवृक्षस्य फलान्येतानि राघव ॥२।१४।१० (श्रीवसिष्ठ म्हणतात ) राज्य, विपुलसंपत्ति, विषयोपभोग आणि मोक्ष ही सर्व विचाररूपी कल्पवृक्षाचींच फळे होत. ४०३ लोकनिन्यस्य दुर्जन्तोजीवितान्मरणं वरम् ॥५।४६।४३
लोकांच्या निंदेला पात्र झालेल्या दुष्ट पुरुषाने जगण्यापेक्षा मरून जाणे हेच श्रेयस्कर आहे. ४०४ लोकस्थितिरलङ्घया हि महतामपि मानद ॥५।६५।३०
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) महात्म्यांनासुद्धा लोकस्थितीचें उलंघन करता येत नाही. ४०५ वरं शरावहस्तस्य चाण्डालागारवीथिषु ।।
भिक्षार्थमटनं राम न मौख्य॑हतजीवितम् ॥ २।१३।२७ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, चांडालांच्या वस्तीतून हातांत थाळी घेऊन भीक मागण्याचा प्रसंग आला तरी पुरवला, परंतु मूर्खपणामुळे निष्फळ झालेलें जीवित कंठण्याचा प्रसंग नको.
For Private And Personal Use Only