Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३१६ बीजात्कारणतः कार्यमङ्कुरः किल जायते ।
न बीजमपि यत्रास्ति तत्र स्यादरः कुतः॥७५७/१२ कारणापासून कार्य उत्पन्न होते. या नियमाप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होतो. परंतु ज्या ठिकाणी बीजच नाहीं तेथें अंकुर कसा उत्पन्न होईल ? ३१७ बीभत्सं विषयं दृष्ट्वा को नाम न विरज्यते ।
सतामुत्तमवैराग्यं विवेकादेव जायते.॥ २११।२३ बीभत्स विषय पाहून त्यांच्याबद्दल कोणाला तिटकारा वाटणार नाहीं? परंतु सत्पुरुषांचे ठिकाणी जे उत्कृष्ट वैराग्य असते तें विवेकामुळे उत्पन्न होते. ३१८ भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्धहिः स्थितम् ॥५॥५६॥३४
कोणत्याही प्राण्याच्या अंतःकरणांत ज्याविषयी विचार चालू असतो त्याप्रमाणेच त्याला बाह्य जगांत दिसत असते. ३१९ भविष्यं नानुसंधत्ते नातीतं चिन्तयत्यसौ ।
वर्तमाननिमेषं तु हसन्नेवानुवर्तते ॥ ५।१२।१४ जनक राजा भावी गोष्टींची चिंता वहात नसे. आणि गत गोष्टींचें स्मरण करीत नसे. तसेंच वर्तमानकाळी सर्व व्यवहार आनंदाने करीत असे. ३२० भारोविवेकिनः शास्त्रं भारो ज्ञानं च रागिणः ।
अशान्तस्य मनो भारो भारो नात्मविदो वपुः॥१।१४।१३ अविवेकी मनुष्याला शास्त्र, विषयी मनुष्याला ज्ञान व रागीट मनुष्याला मन हे भारभूत वाटते. परंतु आत्मज्ञान झालेल्या मनुष्याला शरीर हे भारभूत होत नाही.
For Private And Personal Use Only