Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३४९ यथाचारं यथाशास्त्रं यथाचित्तं यथास्थितम् ।
व्यवहारमुपादत्ते यःस आये इति स्मृतः॥६।१२६।५५ वृद्धांचा आचार व शास्त्र यांच्या अनुरोधाने प्रसन्नचित्ताने यथास्थित कर्म करणारा व लौकिक व्यवहारही पाळणारा, त्याला आर्य असें म्हणतात. ३५० यथा देहोपयुक्तं हि करोत्यारोग्यमौषधम् ।
तथेन्द्रियजयेऽभ्यस्ते विवेकः फलितो भवेत् ॥४।१८।६६ औषध पथ्यपूर्वक सेवन केल्यानेच आरोग्य प्राप्त होते, त्याप्रमाणे इंद्रियजयाचा अभ्यास केला, तरच आत्मानात्मविवेक फलद्रूप होईल. ३५१ यथा न किंचित्कलयन्मश्चके स्पन्दते शिशुः।
तथा फलान्यकलयन्कुरु कर्माणि राघव ॥ ५/७०२० (श्रीवसिष्ठ म्हणतात.) हे राघवा, एखादें लहान मूल कोणत्याही त-हेचा संकल्प न करितां आनंदाने पलंगावर लोळत असते; त्याप्रमाणे कर्मफलाचा मुळींच विचार न करतां तूं आपली प्राप्तकर्मे करीत जा. ३५२ यथा नाशेन वा भाव्यं तथोदेत्यशुभा मतिः।।३।७१।१७
जशा रीतीने नाश व्हावयाचा असतो, तशा त-हेची दुर्बुद्धि अगोदर उत्पन्न होते. ३५३ यथाप्राप्तं हि कर्तव्यमसक्तेन सदा सता ।
मुकुरेणाकलङ्केन प्रतिबिम्बक्रिया यथा ॥ ३॥८८।११ एखादा स्वच्छ आरसा आपल्यासमोर येणाऱ्या पदार्थाचे प्रतिबिंब धारण करतो, त्याप्रमाणे आसक्त न होतां आपलें प्राप्त झालेले कर्तव्य प्रत्येकाने अवश्य करीत राहिले पाहिजे.
For Private And Personal Use Only