Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३३६ मुढानुमानसंसिद्धं दैवं यस्यास्ति दुर्मतेः । दैवाद्दाहोऽस्ति नैवेति गन्तव्यं तेन पावके ।। २२८५
केवळ मूर्खपणाच्या अनुमानामुळें दैव आहे असें ज्याला वाटतें, त्यानें त्या दैवाची परीक्षा करण्याकरितां अग्नीमध्ये उडी टाकून आंगाचा दाह होतो किंवा नाहीं तें पहावें !
३३७ मूढैः प्रकल्पितं दैवं तत्परास्ते क्षयं गताः ।
६७
प्राज्ञास्तु पौरुषार्थेन पदमुत्तमतां गताः || २|८|१६
दैव ही केवळ मूर्खाची कल्पना आहे या दैवाच्या नादीं जे लागतात त्यांचा नाश होतो. ज्ञाते लोक उद्योगाच्या योगानें उत्तम पदाला जाऊन पोहोंचतात.
३३८ मूढोत्तारणमेवेह स्वभावो महतामिति ।। ३ ।७६।१२
मूढ लोकांचा उद्धार करणे हाच महात्म्यांचा स्वभाव असतो. ३३९ मृतिर्गुणितिरस्कारो जीवितं गुणिसंश्रयः || ३।७७।३१ गुणिजनांचा तिरस्कार म्हणजेच मृत्यु आणि गुणिजनांचा आश्रय म्हणजेच खरें जीवित होय.
३४० मोक्षद्वारे द्वारपालाश्चत्वारः परिकीर्तिताः ।
शमो विचारः संतोषश्चतुर्थः साधुसंगमः || २ | ११।५९ शम, विचार, संतोष आणि साधुसमागम हे मोक्षाच्या द्वारावरील चार द्वारपाल आहेत.
३४१ मोक्षः शीतलचित्तत्वं बन्धः संतप्तचित्तता ।। ७/९५/२९
चित्त शांत असणें हा मोक्ष व चित्त संतप्त असणें हा बंध होय. ३४२ मोहनाशाय महतां वचो नो मोहवृद्धये ॥ ५।४९।६ महात्म्यांचं भाषण मोहाचा नाश करतें त्याची वाढ करीत नाहीं.
For Private And Personal Use Only