Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३५४ यथा रजोभिर्गगनं यथा कमलमम्बुभिः ।
न लिप्यते हि संश्लिष्टै हैरात्मा तथैव च ॥ ५।५।३१ आकाशांत धूळ उडाली म्हणून ते मलिन होत नाही, किंवा कमलपत्रावर उदक पडले तरी ते त्याला चिकटत नाही, त्याप्रमाणे आत्म्याशी कितीहि देहांचा संबंध आला तरी तो त्यांच्या योगाने लिप्त होत नाही. ३५५ यथा वन्ध्यासुतो नास्ति यथा नास्ति मरौ जलम् ।
यथा नास्ति नभोवृक्षस्तथा नास्ति जगद्भमः॥३॥७१४३ ज्याप्रमाणे वंध्येचा मुलगा, मृगजळांतील पाणी, आकाशांतील वृक्ष यांना अस्तित्व नसते त्याप्रमाणे जगाच्या भ्रमाची स्थिति आहे. ३५६ यथा शाम्येन्मनोनिच्छं
नोपदेशशतैस्तथा ॥ ७३६।२३ इच्छा सोडल्याने मन जसें शांत होते, तसे शेकडों उपदेशांनीही शांत होत नाही. ३५७ यथा स्पर्शन पवनः सत्तामायाति नो गिरा ।
तथेच्छातानवेनैव विवेकोऽस्य विबुध्यते ॥ ४।१८।६८ नुसता 'वारा ' हा शब्द ऐकल्याने त्याचे अस्तित्व कळत नसते, तर त्यासाठी वान्याचा अंगाला स्पर्श व्हावा लागतो, त्याप्रमाणे 'मी विवेकी आहे ' असे म्हटल्याने विवेकाची परीक्षा होत नाही, तर विषयाची तृष्णा कमी असणे हीच विवेक असल्याची खूण होय. ३५८ यथा हि काष्ठजतुनोर्यथा बदरकुण्डयोः ।
श्लिष्टयोरपि नैकत्वं देहदेहवतोस्तथा ॥ ३॥११४६२ लाकूड आणि लाख किंवा बोरे आणि भांडे ही एकमेकांशी चिकटलेली दिसली, तरी त्यांचे वास्तविक ऐक्य संभवत नाही, त्याचप्रमाणे देह आणि जीवात्मा यांची स्थिति आहे.
For Private And Personal Use Only