Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३१२ बन्धमुक्तो महीपालो ग्राममात्रेण तुष्यति ।
परैरबद्धो नाक्रान्तो न राज्यं बहु मन्यते ॥४।२३१५७ अटकेत असलेला राजा मोकळा झाल्यावर त्याला जरी एखादा गांव मिळाला तरी तेवढ्याने तो संतुष्ट होतो. परंतु ज्याला शबूंनी बद्ध केले नाही व ज्याच्यावर कोणाचा ताबा नाही अशा राजाला राज्य देऊ केले, तरी सुद्धा त्याचे त्याला कांहींच महत्त्व वाटत नाही. ३१३ बलं बुद्धिश्च तेजश्च क्षयकाल उपस्थिते ।
विपर्यस्यति सर्वत्र सर्वथा महतामपि ॥ ७।१४०।६ नाश होण्याची वेळ आली म्हणजे सर्वठिकाणी सर्वप्रकारें मोठमोठ्यांचीही बुद्धि विपरीत होते, बळ चालेनासे होते, व तेज लोपून जाते. ३१४ बहुनात्र किमुक्तेन संक्षेपादिदमुच्यते ।
संकल्पनं परो बन्धस्तदभावो विमुक्तता ॥६।१२६।९७ अधिक बोलून काय करावयाचे आहे ? थोडक्यात सांगावयाचे हे की, संकल्प करणे हाच मोठा बंध होय, व संकल्परहित असणे हाच मोक्ष होय. ३१५ बाल्यमल्पदिनैरेव यौवनश्रीस्ततो जरा ।
देहेऽपि नैकरूपत्वं कास्था बाह्येषु वस्तुषु ॥ १।२८।३७ बाल्यदशेनंतर थोडक्याच दिवसांनी तारुण्य, व नंतर म्हातारपण अशा भिन्न दशा प्रत्यक्ष देहाचे ठिकाणी दिसून येतात; मग बाह्य वस्तु एकरूप राहतील असा भरंवसा ठेवण्यांत काय अर्थ आहे ! -
For Private And Personal Use Only