Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
www.mmmmmmmmmmm
३०७ प्राप्तकालं कृतं कार्य राजते नाथ नेतरत ।
वसन्ते राजते पुष्पं फलं शरदि राजते ॥ ६।०४।२२ (चूडाला शिखिध्वज पतीला म्हणते ) योग्य समयीं केलेलेंच कार्य शोभते. दुसरें शोभत नाही. वसंतऋतूमध्ये फूल शोभते आणि शरहतूंत फळ शोभतें. ३०८ प्राप्तेन येन नो मूयः प्राप्तव्यमवशिष्यते । ___ तत्प्राप्तौ यत्नमातिष्ठेत्कष्टयापि हि चेष्टया ॥७॥६॥३१
जे मिळविले असतां पुन्हां कांहींएक मिळवावयाचें उरणार नाहीं, असेंच पद मिळविण्याविषयी जोराचा प्रयत्न करावा. मग त्यामध्ये कितीही कष्ट पडले तरी चालतील. ३०९ प्रामाणिकस्य तज्ज्ञस्य वक्तुः पृष्टस्य यत्नतः।
नानुतिष्ठति यो वाक्यं नान्यस्तस्मान्नराधमः २।११।४६ प्रमाणशुद्ध भाषण करणा-या तज्ज्ञ मनुष्याला प्रश्न केल्यानंतर जो त्याच्या वचनाप्रमाणे वागत नाही, त्याच्यापेक्षा अधम मनुष्य दुसरा कोणीही नाही. ३१० प्रायः परपरित्राणमेव कमे निजं सताम् ॥ ३॥२६।२०
दुसन्याचे रक्षण करण्यासाठीच सत्पुरुषांच्या हातून कोणतेही कर्म होत असते. ३११ बद्धो हि वासनाबद्धो मोक्षः स्याद्वासनाक्षयः ४।५७१९
जो वासनेने बद्ध असतो, तोच खरा बद्ध आणि ज्याचा वासनाक्षय झाला, तोच मुक्त समजावा.
For Private And Personal Use Only