Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
~
~
~
~
२५९ नित्याशुचेऽप्रियजने भषणैकनिष्ठ
रथ्यान्तरभ्रमणनीतसमस्तकाल । कौलेयकाशयसमानतयैव मन्ये
मूर्खण केनचिदहो बत शिक्षितोऽसि ॥७॥११६।५८ हे कुत्र्या, तुझ्यामध्ये आपल्यासारखेच गुण आहेत असे पाहून, नित्य अपवित्रता, अप्रिय जनांवर भों भों करणे, रस्त्यांतून फिरत सारा वेळ फुकट घालविणे, इत्यादि गुण कोणी मूर्खाने तुला शिकविले आहेत असे मला वाटते. (अर्थात् तुझ्यापेक्षा तुझ्या. गुरूमध्ये असले गुण अधिक असले पाहिजेत.) २६० निरिच्छतैव निर्वाणं सेच्छतैव हि बन्धनम् ॥७॥३६॥३८
इच्छा नसणे हाच मोक्ष होय. आणि इच्छा असणे हाच बंध होय. २६१ निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणोऽधमः।
न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम् ॥११२३९ काल हा निर्दय, कठीण, क्रूर, कर्कश, कृपण आणि अधम आहे. काळ हा ज्याला गिळून टाकीत नाही. असें अद्यापि कांहींच नाही. २६२ निर्मले मुकुरे वक्रमयत्नेनैव बिम्बति ॥ २।२।१९
स्वच्छ आरशामध्ये तोंडाचे प्रतिबिंब सहज रीतीने पडते. २६३ निर्वासनं जीवितमेव मोक्षः ॥७१७७४३
जीवित वासनारहित असणे हाच मोक्ष होय. २६४ निःसंकल्पो यथाप्राप्तव्यवहारपरो भव ॥ ४५३।४७
(दाशूर तपस्वी आपल्या पुत्राला म्हणतो.) संकल्परहित होऊन प्राप्त झालेला व्यवहार योग्य रीतीने करीत जा.
For Private And Personal Use Only