Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२७० पथिकाः पथि दृश्यन्ते रागद्वेषविमुक्तया ।
यथा धिया तथैवैते द्रष्टव्याः स्वेन्द्रियादयः॥६॥११८१५ प्रवासी ज्या मार्गाने जातात, त्या मार्गावर आसक्ति ठेवीत नाहीत त्याप्रमाणे आपल्या देहोंद्रियादिकांस रागद्वेषरहित बुद्धीने पाहावें. २७१ पदमतुलमुपैतुमिच्छतोच्चैः
प्रथममियं मतिरेव लालनीया । फलमभिलषता कृषीवलेन
प्रथमतरं ननु कृष्यते धरैव ॥ ५।१२।४० चांगल्या पिकाची इच्छा करणारा शेतकरी प्रथम जमीन नांगरून तिची उत्तम मशागत करतो, त्याप्रमाणे अतुल अशा परमात्मपदाच्या प्राप्तीची इच्छा करणान्या पुरुषाने प्रथम विवेकाच्या योगाने आपली बुद्धि शुद्ध करावी. २७२ परं विवर्धनं बुद्धेरज्ञानतरुशातनम् । . समुत्सारणमाधीनां विद्धि साधुसमागमम् ।। २।१६।५
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) साधूंचा समागम बुद्धीची वाढ करतो, अज्ञानरूपी वृक्षाला तोडून टाकतो आणि सर्व मानसिक दुःखें नाहींशी करतो. २७३ परं विषयवैतृष्ण्यं समाधानमुदाहृतम् ।
आहृतं येन तन्नूनं तस्मै नृब्रह्मणे नमः ॥ ७४५/४६ विषयांविषयी अत्यंत वैराग्य हेच समाधान आहे. ते ज्याने संपादन केले आहे, त्या मनुष्यरूपी ब्रह्माला नमस्कार असो. २७४ परमपदप्रतिमो हि साधुसङ्गः ॥ ५।६११४८ सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकी आहे.
For Private And Personal Use Only