Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२७५ परं पौरुषमाश्रित्य दन्तैर्दन्तान्विचूर्णयन् ।
शुभेनाशुभमुद्युक्तं प्राक्तनं पौरुषं जयेत् ॥ २।५।९ दांतांनी दांतांचे चूर्ण होईल इतक्या जोराने शास्त्रीय प्रयत्न करून अनर्थ उत्पन्न करणाऱ्या पूर्वीच्या कर्माचा पाडाव करावा. २७६ परस्परेच्छाविच्छित्तिर्न हि सौहार्दबन्धनी ॥३॥५५।७२
परस्परांच्या इच्छांचा भंग झाला असतां खरी मैत्री टिकत नाही. २७७ परस्परेप्सितस्नेहो दुर्लभो हि जगत्रये ॥ ६।१०८।२१
परस्परांना इष्ट असलेला, अर्थात् कृत्रिम नसलेला, स्नेह त्रैलोक्यांत दुर्लभ आहे. २७८ परामृश्य विवेकेन संसाररचनामिमाम् ।
वैराग्यं येऽधिगच्छन्ति त एव पुरुषोत्तमाः २।११।२६ या संसाररचनेचा विवेकाने विचार करून ज्यांना वैराग्य उत्पन्न होते, ते खरोखर उत्तम पुरुष होत. २७९ परायणं हि प्रभवः संदेहेष्वनुजीविनाम् ।। ३।२।१६
सेवकांना कोणतेही संकट उत्पन्न झाले असता, त्याप्रसंगी धनी हाच त्यांचा मुख्य आधार होय. २८० परिज्ञातोपभुक्तो हि भोगो भवति तुष्टये ।
विज्ञाय सेवितो मैत्रीमति चोरो न शत्रुताम् ॥४।२३।४१ अमुक चोर आहे, असे पक्के ज्ञान झाल्यावर त्याच्याशी वागतांना सावधपणा ठेवता येतो, यामुळे स्नेहभाव जुळतो, वैरभाव राहात नाही. त्याप्रमाणे विषयांचे वास्तविक स्वरूप ओळखून, ते योग्य रीतीने सेवन करणाराला त्यांची बाधा होत नाही.
For Private And Personal Use Only