Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२९१ पौनःपुन्येन करणमभ्यास इति कथ्यते ।
पुरुषार्थः स एवेह तेनास्ति न विना गतिः।। ७६७।४३ पुन्हा पुन्हा तेच तेच करणे याला अभ्यास असे म्हणतात, हाच पुरुषार्थ होय. या अभ्यासावांचून मनुष्याला दुसरा मार्ग नाही. २९२ पौरुषं सर्वकार्याणां कर्तृ राघव नेतरत् ।
फलभोक्तृ च सर्वत्र न दैवं तत्र कारणम् ॥ २।९।२ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा; कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संबंध मनुष्याच्या प्रयत्नाकडे आहे; देवाचा त्याच्याशी कांहींएक संबंध नाही. २९३ पौरुषं स्पन्दफलवदृष्टं प्रत्यक्षतो न यत् ।
कल्पितं मोहितैर्मन्दैर्दैवं किंचिन्न विद्यते ।। २।४।१० मनुष्याने प्रयत्नपूर्वक एखादे कार्य केले असता, त्याचा परिणाम प्रत्यक्ष दृष्टीस पडतो. परंतु दैव प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे ती केवळ मंदबुद्धीच्या मूर्ख लोकांची कल्पना आहे. २९४ पौरुषस्य महत्त्वस्य सत्त्वस्य महतः श्रियः ।
इन्द्रियाक्रमणं साधो सीमान्तो महतामपि ॥ ७६.४१ ( विद्याधर भुशुंडाला म्हणतो ) इंद्रियांवर आपला पगडा. बसविण्यासाठी महात्म्यांनाही आपलें पौरुष, महत्त्व, मोठे धैर्य व शांतिरूपी संपदा यांची पराकाष्ठा करावी लागते. २९५ पौरुषादृश्यते सिद्धिः पौरुषाद्धीमतां क्रमः ।
दैवमाश्वासनामात्रं दुःखे पेलवबुद्धिषु ॥ २७१५ कार्यसिद्धि उद्योगाने होते. ज्ञाते पुरुष आपला वर्तनक्रम पौरुषाच्याच योगाने चालवितात. दुबळ्या बुद्धीच्या लोकांना दुःखाचे वेळी समाधानासाठी दैवाचा उपयोग होतो.
For Private And Personal Use Only